शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:52 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात महिला बचतगटांना विविध व्यवसाय-उद्योगासाठी भाग भांडवल व अर्थसाहाय्य उपलब्ध करून देऊन, बचत गटातील महिलांना स्वावलंबी आणि ...

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवास प्रारंभ बचतगट चळवळ सक्षम करण्यास प्राधान्य : शौमिका महाडिक

कोल्हापूर : जिल्ह्यात महिला बचतगटांना विविध व्यवसाय-उद्योगासाठी भाग भांडवल व अर्थसाहाय्य उपलब्ध करून देऊन, बचत गटातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच जिल्ह्यात बचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे प्राधान्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर रविवारपासून आयोजित ताराराणी महोत्सवाचे उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.

यावेळी महापौर सरिता मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बालविकास सभापती वंदना मगदूम, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, हेमंत कोलेकर, डॉ. पद्माराणी पाटील, स्वरूपाराणी जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.महिलांच्या कलागुणांना वाव दिल्यास, तसेच त्यांना संधी उपलब्ध झाल्यास त्या संधीच सोने करतात, असा विश्वास व्यक्तकरून अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिला संघटन आणि महिला सबलीकरणाची महत्त्वपूर्ण काम होत असून, बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा प्रयत्नशील आहे.महापौर सरिता मोरे म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे महत्त्वपूर्ण काम होत असून, महिलांनी नोकरीच्यामागे न लागता बचतगटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय-उद्योगामध्ये सक्रिय व्हावे. प्रारंभी प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, बँक आॅफ इंडियाचे विभागीय अधिकारी एन. जी. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.समारंभास नाबार्डचे साहाय्यक महाप्रबंधक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक निलेश सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, रविकांत आडसुळ, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, साहाय्यक प्रकल्प अधिकारी सचिन पानारी, सम्राट पोतदार, राजेंद्र जाधव यांच्यासह पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सदस्या, अधिकारी आणि बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील बचत गटांनी भरीव कामगिरी करून कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. या महोत्सवामध्ये विविध जिल्ह्यांतील १४८ समूहांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. कोल्हापूरवासीयांनी आगामी ४ दिवसांत ताराराणी महोत्सवास भेट देऊन बचतगटांच्या उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.सुषमा देसाईप्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर