शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शैक्षणिक उपक्रम प्रेरणादायी- वर्षा गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:20 IST

kolhapurnews, zp, educationsector, varshagaikhwad कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपक्रम हे प्रेरणादायी असल्याचे प्रशंसोद्गार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढले. उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. १३) गायकवाड यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचे शैक्षणिक उपक्रम प्रेरणादायी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट, निधीची मागणी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपक्रम हे प्रेरणादायी असल्याचे प्रशंसोद्गार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढले. उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. १३) गायकवाड यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले.कोल्हापूर जिल्ह्यातील प्रचंड महापुरामुळे नुकसान झाल्यानंतर शाळाखोल्या व इमारत दुरुस्तीसाठीचा निधी, शाळांना वेतनेतर अनुदान, रिक्त पदे भरती यांबाबत या पदाधिकाऱ्यांनी यावेळी गायकवाड यांच्याशी चर्चा केली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा निकाल या बाबतींत कोल्हापूर जिल्हा नेहमी अग्रेसर राहिल्याबद्दल गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.प्रचंड महापुरात शाळाखोल्या व इमारतींचे नुकसान झाले; पण या शाळांच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी मिळाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे अनुदान शाळाखोल्या व इमारत दुरुस्तीसाठी प्राप्त होणार नसल्याची वस्तुस्थिती शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी मंत्री गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत आपण सकारात्मक असून जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अर्थसाहाय्य करण्याबाबत लवकर निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी गायकवाड यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर