शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तंबाखूमुक्त शाळांसाठी जिल्हा परिषद आग्रही : अमन मित्तल, लवकरच घेणार कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 11:48 IST

‘तंबाखूमुक्त शाळा’ उपक्रमामध्ये जिल्हा परिषद अग्रभागी राहील, त्यासाठी लवकरच एक कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

ठळक मुद्देतंबाखूमुक्त शाळांसाठी जिल्हा परिषद आग्रही : अमन मित्तललवकरच घेणार कार्यशाळा

कोल्हापूर : ‘तंबाखूमुक्त शाळा’ उपक्रमामध्ये जिल्हा परिषद अग्रभागी राहील, त्यासाठी लवकरच एक कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.सलाम मुंबई फौंडेशन, शासनाचा शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमतर्फे ‘सेहत की राखी’ या उपक्रमाचे जिल्हा परिषदेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी मित्तल यांनी ही माहिती दिली.सलाम फौंडेशनचे राज्य समन्वयक संजय ठाणगे यांनी या अभियानाचा हेतू सांगितला. जिल्हा समन्वयक शिक्षण दिनकर जगदीश, एकनाथ कुंभार यांनी जिल्ह्यात राबविलेले उपक्रम सांगितले. राज्यामध्ये यवतमाळ आणि वर्धा जिल्हे तंबाखूमुक्त शाळा अभियानामध्ये प्रथम आले आहेत.

सध्या नंदूरबार येथे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. कोल्हापूर आणि सांगली येथेही या अभियानाला चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले. ३१ डिसेंबर २0१८ पर्यंत या शाळांचे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहेत.यावेळी पीरवाडी आणि हसूर (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थिनींनी औक्षण करून मित्तल यांना राखी बांधली. गुरुवारीच जिल्ह्यातील सर्व मास्टर्स ट्रेनर्सची याबाबत बैठकही घेण्यात आली होती. आता पुन्हा जिल्ह्यातील ज्या शाळांनी यासाठी प्रस्ताव पाठवलेले नाहीत, त्यांना प्रवृत्त करण्यात येणार आहे.

शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ यांचीही फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांनाही याबाबत आवाहन केले. यावेळी डॉ. सुरेश घोलप उपस्थित होते.

चिमुकलीच्या भाषणाने सीईओ भारावलेराखी बांधल्यानंतर सिद्धी बेरकळ या चिमुकलीने तंबाखूमुक्तीबाबत भाषण केले. तंबाखूमध्ये कोणते अपायकारक घटक असतात इथंपासून तिनं सविस्तर माहिती भाषणात दिली. हे ऐकून मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल प्रभावित झाले. त्यांनी अर्ध्या मिनिटातच तिचे भाषण थांबवले. तिला आपल्याशेजारी खुर्चीत बसवले आणि नंतर संपूर्ण भाषणाचे व्हिडिओ शुटिंग करून घेतले. यावेळी प्रणाली सुतार हिनेही नाटुकली सादर केली. या दोघींचेही मित्तल यांनी कौतुक केले. 

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाkolhapurकोल्हापूर