शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषद देशात दुसरी, स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:44 IST

जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशामध्ये दुसरा, तर महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबतची घोषणा करण्यात आली. ३१ जानेवारी २0१९ पर्यंत केवळ १५ दिवसांमध्ये साडेपाच लाख शौचालयांपैकी चार लाख ३१ हजार ५८१ शौचालये रंगविण्याची कामगिरी जिल्हा परिषदेने केली होती.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषद देशात दुसरी स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचा निकाल जाहीर

समीर देशपांडेकोल्हापूर : जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूरजिल्हा परिषदेने देशामध्ये दुसरा, तर महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबतची घोषणा करण्यात आली. ३१ जानेवारी २0१९ पर्यंत केवळ १५ दिवसांमध्ये साडेपाच लाख शौचालयांपैकी चार लाख ३१ हजार ५८१ शौचालये रंगविण्याची कामगिरी जिल्हा परिषदेने केली होती.केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून १९ नोव्हेंबर २0१८ रोजी ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर कार्यशाळा घेऊन, या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त उपक्रम राबविले जातील, असे नियोजन करण्यात आले होते.शाश्वत स्वच्छतेसाठी अंतर्व्यक्ती संवाद साधने, स्वच्छतेसाठी शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रबोधनपर प्रभातफेरीचे आयोजन करणे, स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करणे, ग्रामपंचायत स्तरावर हागणदारीमुक्तीबाबत फलक लावणे, शौचालयाच्या नियमित वापराबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करणे, असे विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती, छायाचित्र, व्हिडीओ हे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर भरण्यात आली होती.

अधिकारी, पदाधिकारी रंगविण्यासाठी गावागावांत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी शौचालय रंगविण्यासाठी गावागावांत फिरले. प्रत्यक्ष हातात ब्रश घेऊन महाडिक आणि मित्तल यांनी शौचालये रंगवली. पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी या मोहिमेचे नेटके नियोजन केले. सर्व ग्रामपंचायती, पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणेने झोकून काम केल्याने देशात दुसऱ्या क्रमांकाचा मान कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाला.

पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ एकत्र आले की काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून या निकालाकडे पाहिले पाहिजे. आम्ही सर्वांनी १५ दिवस एकच ध्येय ठेवून काम केले आणि आज कोल्हापूर जिल्हा परिषद देशामध्ये या स्पर्धेमध्ये दुसरी आली आहे. देशपातळीवरच्या या सन्मानाने कोल्हापूरचे नाव उंचावले असून, या मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करून आभार मानते.शौमिका महाडिकअध्यक्षा, जिल्हा परिषद कोल्हापूर

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर