कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून काही पदांसाठी परीक्षा झाल्याही आहेत. परंतू उर्वरित परीक्षांच्या तारखा अनिश्चित आहेत. त्यामुळे सध्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाऊनलोड होत नसल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पेपरच्या तारखा जाहीर होतील त्याआधी सात दिवस उमेदवारांचे हॉल तिकीट डाऊनलोड होणार आहे.या महिन्यापासून जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा आयबीपीएस कंपनीकडून घेतल्या जात आहेत. यातील सात संवर्गांच्या परीक्षांचे पेपर झाले आहेत. याच दरम्यानच्या काळात अन्य काही विभागांच्या परीक्षा असल्याने आणि जिल्हा परिषद जागांसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार असल्याने तेवढ्या मोठ्या प्रमाणावर केंद्रे उपलब्ध होत नसल्याने या परीक्षा काही दिवस स्थगित असून केंद्रे उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी हॉलतिकीट डाऊनलोड होत नसल्यास उमेदवारांनी नाराज न होता पेपरच्या तारखेआधी सात दिवस हॉलतिकिट डाऊनलोड करण्याची लिंक ओपन होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या तारखा अनिश्चित, जाणून घ्या कारण
By समीर देशपांडे | Updated: October 20, 2023 17:20 IST