शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नागाव फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू, एक जण जखमी

By उद्धव गोडसे | Updated: September 3, 2023 16:32 IST

Kolhapur: दुचाकीवरून इंगळी (ता. हातकणंगले) येथील मामाकडे निघालेल्या भाच्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने उडवून फरफटत नेले.

- उद्धव गोडसेकोल्हापूर -  दुचाकीवरून इंगळी (ता. हातकणंगले) येथील मामाकडे निघालेल्या भाच्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने उडवून फरफटत नेले. पुणे-बेंगळुरू महामार्गावर नागाव फाट्याजवळ रविवारी (दि. ३) दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या अपघातात भाचा हर्षद सुनील बुद्रुक (वय २०) हा ठार झाला. त्याचा मित्र सुजल रामचंद्र बागणे (वय २०, दोघे रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली) हा गंभीर जखमी झाला.

शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐतवडे बुद्रुक येथील हर्षद बुद्रुक आणि त्याचा मित्र सुजल बागणे हे दोघे रविवारी दुपारी इंगळी येथील मामाकडे निघाले होते. पुणे-बेंगळुरू महामार्गावरून जाताना नागाव फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने हर्षदच्या दुचाकीला उडवून काही अंतर फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला सुजल बाजूला फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला, तर हर्षदच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. दोन्ही जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच हर्षदचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हर्षद हा तळसंदे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचा वाळवा तालुका अध्यक्ष होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजोबा असा परिवार आहे.

अपघाताची माहिती मिळ‌ताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सीपीआरमध्ये पाठवले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकास ताब्यात घेऊन पोलिसांनी ट्रक जप्त केला. ट्रक चालकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर