शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : यंदाच्या फुटबॉल हंगामास २४ पासून प्रारंभ, के.एस.ए.लीग स्पर्धेने सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:08 IST

कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरीतील फुटबॉल हंगामाची सुरूवात शनिवारी (दि. २४) पासून के.एस.ए.लीग फुटबॉल स्पर्धेने होत आहे. यात हंगामाचा किक आॅफ संध्यामठ तरूण मंडळ व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यातील लढतीने होणार आहे.

ठळक मुद्देयंदाच्या फुटबॉल हंगामास २४ पासून प्रारंभ, के.एस.ए.लीग स्पर्धेने सुरूवातपहिली लढत संध्यामठ- ऋणमुक्तेश्वर यांच्यात

कोल्हापूर : कोल्हापूरच्याफुटबॉल पंढरीतील फुटबॉल हंगामाची सुरूवात शनिवारी (दि. २४) पासून के.एस.ए.लीग फुटबॉल स्पर्धेने होत आहे. यात हंगामाचा किक आॅफ संध्यामठ तरूण मंडळ व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यातील लढतीने होणार आहे.शाहू स्टेडीयमवर सुरू होणाऱ्या या हंगामाची सुरूवात के.एस.ए. लीग स्पर्धेने होणार आहे. यात सुपर सिनिअर गटात ८, तर सिनिअर गटात ९ संघ असे एकूण १७ संघांचा समावेश आहे. यात पाटाकडील (अ)व (ब), शिवाजी तरूण मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ) व (ब), बालगोपाल तालीम मंडळ,खंडोबा तालीम मंडळ (अ), दिलबहार तालीम मंडळ (अ) व (ब), कोल्हापूर पोलीस संघ, मंगळवार पेठ फुटबॉल संघ, फुलेवाडी क्रीडा मंडळ, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ, उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीम मंडळ, संध्यामठ तरूण मंडळ, साईनाथ स्पोर्टस, यांचा समावेश आहे.

सर्व संघांनी वरचे स्थान पटकाविण्यासाठी कंबर कसली आहे. विशेषत: संघाना फिटनेसचे महत्व पटवून देण्यासाठी खास फिजीकल ट्रेनरही काही संघांनी नियुक्त केले आहेत. त्यामुळे आघाडीच्या खेळाडूंना ४०-४० मिनिटांच्या सत्रात संपूर्ण वेळ खेळण्यासाठी विशेष तयार केले जात आहे. त्यादृष्टीने त्यांच्याकडून कसून सराव करून घेतला जात आहे. मागील वर्षी के.एस.ए. लीग स्पर्धेत १५ संघ व ४९ सामने झाले होते. यंदा मात्र, १७ संघ व ६४ सामने होणार आहेत.हंगामाची सुरूवात के.एस.ए.लीग स्पर्धेने २४ नोव्हेंबरपासून होत आहे. हंगामाची सुरूवात संध्यामठ तरूण मंडळ व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यात दुपारी दोन वाजता होणाऱ्या सामन्याने होणार आहे. तर त्याच दिवशी दुपारी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ (अ) व संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ यांच्यातही दुसरा सामना होणार आहे. हंगामाची सुरूवात दमदार संघातील लढतीने होणार आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यांबद्दल आतापासूनच फुटबॉल रसिकांना उत्सुकता लागून राहीली आहे.

यांच्या कामगिरीकडे विशेष लक्षकाही संघांनी प्रतिमहिना १० ते ६५ हजारांपर्यंतचा मेहनताना देवून १३ आंतरराष्ट्रीय, तर २० राष्ट्रीय आणि ११ राज्यस्तरीय फुटबॉलपटूंना आपल्या संघातून स्थान दिले आहे. त्यामुळे पेठांपेठांतील फुटबॉल समर्थकांचे या खेळाडूंच्या खेळीकडे विशेष लक्ष लागून राहीले आहे. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर