शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘सावली’तील कार्यशाळेने झाली ‘पांढऱ्या काठी’शी मैत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:52 IST

कोल्हापूर येथील ‘सावली केअर सेंटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंध व्यक्तींसाठीच्या कार्यशाळेचा तीन जिल्ह्यांतील १९ अंधांनी लाभ घेतला. दोन दिवसांची ही कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्दे‘सावली’तील कार्यशाळेने झाली ‘पांढऱ्या काठी’शी मैत्रीतीन जिल्ह्यांतील १९ अंध व्यक्तींनी घेतला लाभ

कोल्हापूर : येथील ‘सावली केअर सेंटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंध व्यक्तींसाठीच्या कार्यशाळेचा तीन जिल्ह्यांतील १९ अंधांनी लाभ घेतला. दोन दिवसांची ही कार्यशाळा पार पडली.रोटरी क्लब आॅफ मिडटाऊन, कोल्हापूर यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा घेण्यात आली. सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, पुणे येथील अंध व्यक्तींनी यात सहभाग घेतला. रोटरी क्लब आॅफ मिडटाउनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, खजानिस सचिन लाड, स्वयंसेवक शैला आठल्ये, अनुजा नेटके, ‘सावली’चे विश्वस्त किशोर देशपांडे, सोनाली नवांगुळ, अंधशाळेचे शिक्षक बी. आर. पाटील, वेदिका फडके यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.या प्रशिक्षणात पांढऱ्या काठीच्या साहाय्याने रस्त्यातील अडथळे शोधणे, पायऱ्या व खडकाळ भाग शोधून कुणाच्याही मदतीशिवाय नीट चालता येणे, रस्त्यावरचे आवाज, वास घेत-ऐकत आवश्यक त्या ठिकाणच्या खुणा मनात नोंदवीत समाजात मिसळणे, धान्ये-कडधान्ये, भाजीपाला ओळखू शकणे, नोटा व नाणी ओळखता येणे अशा अनेक गोष्टी शिकवून त्यांचा सराव घेतला गेला.अंध व्यक्तींसाठीच्या कार्यात गेली तीस वर्षे समर्पित असणारे कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक स्वागत थोरात म्हणाले, २०२० पर्यंत अधिकाधिक अंध व्यक्तींनी संगणकाचे ज्ञान घेऊन आपल्या परीक्षा रायटरशिवाय द्याव्यात व अधिक सक्षम व्हावे.

समारोपावेळी निशिकांत सरनाईक म्हणाले, सामाजिक कामांमध्ये ‘रोटरी’चा नेहमीच पुढाकार असतो व भविष्यातही ‘सावली’ने अशा प्रकारची शिबिरे घेऊन अधिकाधिक बांधवांना स्वावलंबी बनवावे. विविध आजारांमुळे अथवा अपघातांमुळे प्रौढ वयात अचानक अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी लवकरच स्वागत थोरात व ‘रोटरी’च्या मदतीने आम्ही नवे शिबिर जाहीर करीत आहोत, असे किशोर देशपांडे यांनी सांगून आभार मानले.

माझ्या शाळेत स्पेशल शिक्षक होते; पण पांढरी काठी कशी वापरायची आणि तिच्या आधारे स्वत: अडथळ्यांचे रस्ते कसे पार करायचे, लिफ्ट कशी वापरायची, हे कधीच शिकवलं गेलं नाही. प्रशिक्षक स्वागत थोरात यांनी घेतलेल्या या मोबिलिटी प्रशिक्षणात जे शिकलो, ते कौशल्य वापरून मी अधिक आत्मविश्वासाने पुण्याला परततो आहे.- विश्वनाथ नवले(मूळ सांगोला, जि. सोलापूर, सध्या पुणे येथे बॅँक आॅफ इंडियामध्ये कार्यरत)

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर