शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शेतीपंप वीज दरवाढीविरोधात २४ डिसेंबरला चक्काजाम : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:55 IST

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी २४ डिसेंबरला पुणे-बंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी  दिली.

ठळक मुद्देशेतीपंप वीज दरवाढीविरोधात २४ डिसेंबरला चक्काजाम : एन. डी. पाटील आता आश्वासने नको, थेट अंमलबजावणीच हवी

कोल्हापूर : शेती पंपांची वीजदरवाढ कमी करण्याबरोबरच चुकीची बिले १५ आॅगस्टपूर्वी दुरुस्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते; पण आश्वासनापलिकडे काहीच झाले नसून, आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला आहे.

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी २४ डिसेंबरला पुणे-बंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी  दिली.प्रा. पाटील म्हणाले, भाजप सरकारने चार वर्षांत पाचवेळा वीज दरवाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच चुकीची बिल आकारणी करून मानगुटीवर थकबाकीचा बोजा दिला, या विरोधात २७ मार्च २०१८ ला विधानभवनावर धडक मोर्चा काढला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जा सचिव अरविंद सिंग, संजीवकुमार, अभिजित देशपांडे, आदींसोबत बैठक झाली.

त्यावेळी झालेल्या चर्चेत राज्यातील ४१ लाख शेतीपंपधारक वीज ग्राहकांची बिले १५ आॅगस्टपूर्वी तपासून दुरुस्त केले जाईल. अचूक बिलांच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येईल, सर्व उपसा जलसिंचन योजनांची वीज बिले १.१६ रुपये प्रति युनिट दराने भरून घेतली जातील. उच्चदाब वीज ग्राहकांच्या बिलातील थकबाकी १५ आॅगस्टपूर्वी निकालात काढली जाईल, आदी मागण्या मान्य केल्या होत्या. यापैकी एकाही मागणीची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नसल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले असून, १० किंवा १२ डिसेंबरला बैठक घेण्याचे पुन्हा आश्वासन दिल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले; पण आता नुसती बैठक आणि आश्वासने नकोत, वीज दरवाढ, थकबाकी व शासकीय पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याबाबत ठोस अंमलबजावणी पाहिजे.अंमलबजावणी केली तरच आंदोलनाबाबत विचार करू, अन्यथा २४ डिसेंबरला ठरल्याप्रमाणे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली पुलाची येथे रस्ता रोको करून चक्का जाम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, शेतकरी सहभागी होतील, असे होगाडे यांनी सांगितले.

यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, चंद्रकांत पाटील, एस. ए. कुलकर्णी, जे. पी. लाड, आर. के. पाटील, महादेव सुतार, मारुती पाटील उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर