शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महिला स्वच्छतागृहांची सोय करावी, शिवसेनेचे महापालिका आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:10 IST

कोल्हापूर शहराच्या विविध भागांत महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन, गणेशोत्सव काळात तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात सोय करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना शहर शाखेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले.

ठळक मुद्देमहिला स्वच्छतागृहांची सोय करावीशिवसेनेचे महापालिका आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन, गणेशोत्सव काळात तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात सोय करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना शहर शाखेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले.शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळाने शहरात स्वच्छतागृहे नसल्यामुळे महिलांच्या होणाऱ्या गैरसोईकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.गणेशोत्सव काळात शहरात जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते.

अंबाबाई मंदिरात येणाऱ्या महिला भाविकांचीही संख्या मोठी असते. महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते; त्यामुळे जास्तीत जास्त तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय करावी, त्यांची रोज स्वच्छता करावी, अशी सूचना शिष्टमंडळाने केली.गणेशोत्सव काळात स्थानिक यात्री निवास, लॉजिंग-बोर्डिंग, हॉटेल्स यांना नोटीस काढून महिलांकरिता मोफत स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यास सांगावे. त्यासंबंधीचा फलक लॉजिंगसमोर लावण्यास सांगावे, अशी सूचना शिष्टमंडळाने केली.पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केले जात असताना मूर्तींची विटंबना होणार नाही, याची दखल घ्यावी. गणेशोत्सव काळात महापालिकेकडून शहरात स्वच्छता ठेवावी, औषध फवारणी केली जावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

शिष्टमंडळात दत्ताजी टिपुगडे, योगेश शिंदे, रवी चौगुले, अभिजित बुकशेट, विराज ओतारी, शशिकांत बिडकर, मेघना पेडणेकर, अभिजित लाड, दीपाली शिंदे, वीरू सांगावकर, दिलीप देसाई, धनाजी यादव, सुजाता सोहनी, कविता सुतार यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर