शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित : संगीता तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 14:06 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने स्थानिक पातळीवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच भाग म्हणून बूथ कमिट्यांच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याची माहिती प्रदेश महिला कॉँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वाधिक असुरक्षिततेची भावना देशातील महिलांमध्ये असून, भाजपच्या राजवटीचा कंटाळा आल्याने राज्यासह देशात परिवर्तन होणार हे निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले. ​​​​​​​

ठळक मुद्देबूथ कमिट्यांच्या माध्यमातून कॉँग्रेस सक्षम करणार भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित : संगीता तिवारी

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने स्थानिक पातळीवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच भाग म्हणून बूथ कमिट्यांच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याची माहिती प्रदेश महिला कॉँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वाधिक असुरक्षिततेची भावना देशातील महिलांमध्ये असून, भाजपच्या राजवटीचा कंटाळा आल्याने राज्यासह देशात परिवर्तन होणार हे निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कॉँग्रेस कमिटीत बूथ कमिट्यांसह पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध संकल्पनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यासाठी संगीता तिवारी, महिला प्रदेश उपाध्यक्षा निगार बारसकर, वंदना सातपुते व जयश्री पाटील यांची समन्वयक म्हणून पक्षाने नेमणूक केली आहे.तिवारी म्हणाल्या, तीन राज्यांत भाजपचे पाणीपत करत कॉँग्रेसने सत्ता हस्तगत केल्यानंतर कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. हा आत्मविश्वास घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून, गाव पातळीवर पक्ष बळकटीचे धोरण आहे. बूथ कमिट्यांसह पक्षाच्या वतीने विविध संकल्पना राबविल्या जात आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करायची याची माहिती कार्यशाळांच्या माध्यमातून दिली.समाज परिवर्तनाचे सक्षमपणे काम महिलाच करू शकतात. राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा पक्षाच्या कार्यकर्त्या घरोघरी जाऊन वाचणार असल्याचे निगार बारसकर यांनी सांगितले. कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सरलाताई पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, एस. के. माळी, रूपाली पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर