शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकर रविवारी धावणार स्वत:साठी, ‘लोकमत महामॅरेथॉन’चा रंगणार थरार; ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 09:26 IST

संपूर्ण कोल्हापूरला वेध लागलेली ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी रविवारी (दि. १८) या महामॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकर, धावपटू, खेळाडू धावणार आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरकर रविवारी धावणार स्वत:साठी‘लोकमत महामॅरेथॉन’चा रंगणार थरार ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ आज

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूरला वेध लागलेली ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी रविवारी (दि. १८) या महामॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकर, धावपटू, खेळाडू धावणार आहेत.

या महामॅरेथॉनच्या माध्यमातून करवीरनगरीमधील क्रीडासंस्कृतीमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना आज, शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पोलीस ग्राउंड येथील अलंकार हॉल येथे टी-शर्ट आणि बीब (चेस्ट नंबर), गुडी बॅग वाटप करण्यासाठी ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ होणार आहे.सर्व शहर एकत्र यावे, आपापसांत जिव्हाळा निर्माण व्हावा आणि मैत्री वृद्धिंगत व्हावी, शहरात एकोपा वाढावा हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘लोकमत’ समूहाने ही महामॅरेथॉन आयोजित केली आहे. येथील पोलीस ग्राउंडमधून रविवारी महामॅरेथॉनचा प्रारंभ होणार आहे. यात पहिल्यांदा सकाळी सहा वाजता २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनला सुरुवात होईल. यानंतर १० किलोमीटर पॉवर रन, फॅमिली व ज्येष्ठ नागरिकांसाठी फन रन आणि ५ किलोमीटर या गटांमध्ये अर्धमॅरेथॉन होणार आहे. यानंतर आठ वाजता दिव्यांग रन होईल.

राज्यभरातील धावपटू या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. विविध गटांसाठी एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड, विशेष दलांतील धावपटूंसाठी विशेष बक्षीस आहेत. कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच होणारी महामॅरेथॉन अनोखी आणि सहभागी नागरिक, धावपटू, खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरणार आहे.

‘बीब’असणे आवश्यकमहामॅरेथॉनमध्ये केवळ नोंदणी केलेल्या स्पर्धकास प्रवेश देण्यात येईल. स्पर्धकांनी या दिवशी बीब (चेस्ट नंबर) घेऊन येणे अत्यावश्यक आहे. या ‘बीब’शिवाय स्पर्धकांना पोलीस ग्राउंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यासह धावपटू, स्पर्धकांना सहभागाचे मेडल, ब्रेकफास्ट मिळणार आहे.

गटनिहाय महामॅरेथॉन सुरू होण्याची वेळ* २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन : ६ वाजून १५ मिनिटे* १० किलोमीटर पॉवर रन : ६ वाजून ३० मिनिटे* ५ किलोमीटर फन रन : ६ वाजून ४० मिनिटे* ३ किलोमीटर फॅमिली रन : ६ वाजून ४५ मिनिटे

धावपटू, स्पर्धकांनी पहाटे पाच वाजता यावेमहामॅरेथॉनमधील विविध गटांत सहभागी झालेल्या धावपटू, स्पर्धक आणि नागरिकांनी पहाटे पाच वाजता पोलीस ग्राउंड येथे उपस्थित राहावे. पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी वॉर्मअपला सुरुवात होईल. त्याचा समारोप ६ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे. यानंतर २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनची सुुरुवात होईल.

 

सध्या टी.व्ही., सोशल मीडियामुळे अनेकांचे दैनंदिन व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे समाजात विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. ते टाळण्यासह प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. धावणे हा व्यायाम प्रकार चांगला आहे. आरोग्याबाबत दक्ष आणि सजग करणारा महामॅरेथॉन हा ‘लोकमत’चा उपक्रम कौतुकास्पद आहे. मॅरेथॉनला एक नवे रूप देत कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेतील नव्या पर्वाची सुरुवात ‘लोकमत’च्या माध्यमातून होत आहे. आरोग्याबाबत लोकांना सजग करण्यासह विजेत्यांसाठी मोठ्या रकमेची बक्षिसेदेखील या ‘महामॅरेथॉन’मधून मिळणार आहेत. धावपटू, खेळाडूंसह नागरिकांना या महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.- खासदार धनंजय महाडिक 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathon 2018लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८kolhapurकोल्हापूर