शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रुग्णालयातून बाहेर पडताच अटक करणार : तानाजी सावंत, लक्षतीर्थ वसाहत खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 18:30 IST

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून झालेल्या तलवार हल्ल्यातील दोघे आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक केली जाईल. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली. मंगळवारी झालेल्या खुनी हल्ल्यामध्ये सुनील सर्जेराव पाटील (वय ३०) व केदार भागोजी घुरके (२१) हे जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देलक्षतीर्थ वसाहत खुनी हल्ला; परस्परविरोधी गुन्हे दाखलरुग्णालयातून बाहेर पडताच अटक करणार : तानाजी सावंत

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून झालेल्या तलवार हल्ल्यातील दोघे आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक केली जाईल.

या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली. मंगळवारी झालेल्या खुनी हल्ल्यामध्ये सुनील सर्जेराव पाटील (वय ३०) व केदार भागोजी घुरके (२१) हे जखमी झाले आहेत.केदार घुरके याने सुनील पाटील याच्याकडून व्यापारासाठी पैसे घेतले होते. ते व्याजासहित परत केले होते. यापूर्वीही पैशांच्या देवघेवीवरून त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी (दि. २७) दोघेही लक्षतीर्थ वसाहतीमधील तळ्यावरील महादेव मंदिराच्या समोर येताच त्यांच्यात पैशांवरून जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये दोघेही जखमी झाले.

त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक सावंत यांनी या दोघांची बुधवारी रुग्णालयात भेट घेऊन जबाब नोंदविले. त्यानुसार खुनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल केला.

सुनील पाटील याच्या जबाबात ‘संतोष बोडके माझे पैसे द्यायचा आहे,’ असा उल्लेख आल्याने बोडकेची याप्रकरणी चौकशी होणार आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील करत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा