शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापूर : सुविधांची वानवा असताना ‘स्पोर्ट झोन’ चे कौतुक कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:42 IST

प्रशासनाने केवळ ‘स्पोर्ट झोन’चा फलक लावून दिखाऊपणा करण्याऐवजी विभागीय क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष द्यावे. सुविधांच्या उभारणीसाठी भरीव स्वरूपात योगदान द्यावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे.

ठळक मुद्दे सुविधांची वानवा असताना ‘स्पोर्ट झोन’ चे कौतुक कशाला?विभागीय क्रीडा संकुलाकडे लक्ष द्यावे; क्रीडाप्रेमींची मागणी

कोल्हापूर : फुटबॉल, जलतरण, नेमबाजी, कुस्ती अशा विविध क्रीडाप्रकारांमध्ये कोल्हापूरचे खेळाडू चमकत आहेत. ते निव्वळ स्व:कर्तृत्वावर. त्यांना जिल्ह्यात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे म्हणावे तितके लक्ष नाही. जिल्ह्यात क्रीडाविषयक आवश्यक सुविधांची वानवा असताना प्रशासनाने केवळ ‘स्पोर्ट झोन’चा फलक लावून दिखाऊपणा करण्याऐवजी विभागीय क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष द्यावे. सुविधांच्या उभारणीसाठी भरीव स्वरूपात योगदान द्यावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे.तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने गेल्या दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली जिल्ह्यांसाठी विभागीय क्रीडा संकुल हे कोल्हापूरमध्ये मंजूर केले. या संकुलात १७ कोटी रुपयांची कामे झाल्याचे क्रीडा विभागाकडून सांगितले जात आहे; मात्र प्रत्यक्षात जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव, नेमबाजीसाठीचे शूटिंग रेंज अपूर्ण आहे. सिंथेटिक अ‍ॅथलेटिक्स मैदान, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल मैदान आंतरराष्ट्रीय मानांकनाला धरून नाहीत.

फुटबॉल मैदान योग्य स्वरूपात नाही, अशा पद्धतीने या संकुलाची स्थिती आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था आहे. अ‍ॅथलेटिक्स् खेळाडूंसाठी चांगले मैदान उपलब्ध नाही. या संकुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष देण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ‘स्पोर्ट झोन’ चा नुसता फलक उभारून प्रशासनाला काय साध्य करावयाचे आहे. संकुल पूर्णत्वास आल्यास चांगले खेळाडू तयार होण्यास निश्चितपणे गती मिळेल, असे मत क्रीडाप्रेमींतून व्यक्त होत आहे.

क्रीडाक्षेत्रातील कोल्हापुरी टॅलेंटला बळ देण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल हे सर्व सुविधा आणि पूर्ण क्षमतेने खुले होणे आवश्यक आहे; पण, गेल्या नऊ वर्षांपासून हे संकुलाचे काम पूर्ण करण्यात सरकार आणि जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. अशा स्वरूपातील नाकर्तेपणा असताना निव्वळ ‘स्पोर्ट झोन’चा फलक लावून प्रशासनाला काय सिद्ध करायचे आहे, तेच समजत नाही. या संकुलाच्या पूर्णत्वाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- जीवन बोडके, आर्किटेक्ट

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार करणे ठीक आहे; पण, गरजेच्या सुविधा उपलब्ध नसताना निव्वळ फलक उभारून कौतुक करणे योग्य नाही. कोल्हापूरमधील खेळाडूंना ताकद देण्यासाठी, नवी पिढी घडविण्याकरिता विभागीय संकुलाची पूर्ण सुविधांसह उभारणी गरजेची आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले टाकावीत.- विकास पाटील, माजी फुटबॉल खेळाडू 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRahi Sarnobatराही सरनोबतkolhapurकोल्हापूर