शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर : कॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायब, ओला कचरा डंपीग करणार कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:08 IST

सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्कीच आहे.

ठळक मुद्देकॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायबओला कचरा डंपीग करणार कोठे?

कोल्हापूर : लाईनबाजार परिसरातील झुम प्रकल्पावर साचलेल्या तीन ते चार लाख टन कचऱ्यावर कॅपींग करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाच्या विचाराधिन असला तरी भविष्यकाळाचा विचार करता परवडणारा नाही. सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्कीच आहे.गेल्या अनेक वर्षापासून शहरातील कचरा लाईनबाजार येथील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. सध्या घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे दिवसे दिवस कचऱ्याचा पश्न गंभीर बनला आहे. रोज सरासरी १८० ते २०० टन कचरा लाईन बाजार परिसरात नेऊन टाकला जातो. त्यामुळे कित्तेक मिटर उंचीचे डोंगर तयार झाले आहेत.

सुमारे पाच एकर परिसरात असलेला हा कचरा डेपो आता पूर्णपणे भरलेला आहे. या कचऱ्यात खरमाती, दगडधोंडे राहिले असल्याने त्या विघटन होणे शक्य नाही. हा अविघटनशील कचरा शहरानजिकच्या खणीतून टाकण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला.परंतु त्याला विरोध होत राहिल्याने कचऱ्याचा पश्न गेल्या तीन वर्षात अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.टोप येथील खण तसेच टाकळा येथील खण महापालिकेच्या ताब्यात आहे. लाईनबाजार येथील अविघटनशील कचरा टोप किंवा टाकळा येथील खणीत नेऊन टाकण्याचा खर्च वाढलेला आहे. मध्यंतर प्रशासनाने किती खर्च येऊ शकेल याचा अंदाज घेतला असता साधारणपणे १७ ते १८ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे वित्त आयोगातून निधी द्यावा अशी मागणी करणारा प्रस्ताव पाठविला.त्यावेळी मंत्रालयात चर्चा झाली. कचऱ्याच्या वाहतुकीवर एवढा खर्च करण्यापेक्षा आहे त्याच जागेवर कॅपींग करा, तुलनेने कमी म्हणजे ८ ते ९ कोटी रुपयांचा खर्च येऊ शकेल असा पर्याय शासकीय अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिला. त्यामुळे कॅपींगचा प्रस्ताव प्राधान्याने पुढे आला आहे.विशिष्ट प्रावरण अंथरुण या कचऱ्यावर कॅपींग केले जाणार आहे. त्यामुळे कचरा जागेवरुन हलणार नाही. तेथेच डोंगर उभे राहणार आहेत. शिवाय ही जागा गायब होणार आहे. जर कॅपींग केले तर नव्याने येणारा कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न निर्माण होणार आहे. खर्च कमी होतो

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkolhapurकोल्हापूर