शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आयटीआय चौकात एअर व्हॉल्व्ह खराब झाल्याने लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:48 IST

आयटीआय चौकातून जाणाऱ्या ११०० एम. एम. जाडीच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाल्यामुळे मंगळवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाहून गेले. ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच या व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. या प्रकारामुळे मंगळवारी राजारामपुरी परिसरात उशिरा पाणीपुरवठा झाला.

ठळक मुद्देआयटीआय चौकात एअर व्हॉल्व्ह खराब लाखो लिटर पाणी वाया

कोल्हापूर : आयटीआय चौकातून जाणाऱ्या ११०० एम. एम. जाडीच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाल्यामुळे मंगळवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाहून गेले. ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच या व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. या प्रकारामुळे मंगळवारी राजारामपुरी परिसरात उशिरा पाणीपुरवठा झाला.शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील जलवाहिनीला चंबुखडी व कणेरकरनगर येथे लागलेल्या गळतीमुळे सोमवारी (दि. २१) दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. रात्री साडेबारा वाजता काम पूर्ण झाल्यानंतर दीड वाजता पाणी उपसा सुरू झाला.

त्यानंतर पहाटे चार वाजता पुईखडी येथून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यावेळी जलवाहिनीतील हवेच्या दाबाने आयटीआय चौकातील एअर व्हॉल्व्ह अचानक लॉक होऊन नादुरुस्त झाला. त्यामुळे तेथून पुढे पाणी जायचे बंद झाले. या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू झाली.या व्हॉल्व्हमधून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात कारंजा उडू लागला. सुमारे दोन तासांत लाखो लिटर पाणी वाहून गेले. ही बाब पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी तत्काळ पुईखडी येथून पाणीपुरवठा बंद केला.

तसेच तातडीने व्हॉल्व्हची दुरुस्ती हाती घेतली. काम पूर्ण होताच सकाळी सातनंतर पाणीपुरवठा नियमितपणे सुरू झाला. या सगळ्या प्रकाराने राजारामपुरी परिसराला मंगळवारी उशिरा आणि तेही कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर