शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अपात्र ठरणाऱ्या नगरसेवकांना आणखी आठ दिवसांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:05 IST

निवडणूक आयोगास जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाऱ्या नगरसेवकांबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत झाला नाही.

ठळक मुद्देअपात्र ठरणाऱ्या नगरसेवकांना आणखी आठ दिवसांची प्रतीक्षाकारवाई न करण्याच्या सूचना : धाकधुक वाढली

कोल्हापूर : निवडणूक आयोगास जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाऱ्या नगरसेवकांबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत झाला नाही.

चार विभागांकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात काही तांत्रिक चुका राहून गेल्या असल्याने त्या दुरुस्त करून हा प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. तोपर्यंत कारवाई न करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींचे पद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होत असून, निवडणूक आयोगाने कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.परंतु राज्य सरकारने राज्यातील सुमारे सहा हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींना न्याय देण्यासाठी कायद्यातील तरतुदींत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता नगरविकास, ग्रामविकास, समाजकल्याण तसेच विधि व न्याय अशा चार विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे.

जात पडताळणी समितीच्या चुकीला लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत. त्यांचा त्यात कोणताही दोष नाही; म्हणूनच त्या पद्धतीने अभ्यास करून कोणत्याही कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत, असा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव सादरही केला; परंतु त्यामध्ये काही तांत्रिक चुका राहिल्या असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत प्रस्ताव सादर करा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, निर्णय होईपर्यंत राज्यातील कोणाही लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची कारवाई केली जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.मंगळवारच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महानगरपालिकेच्या वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. नगरसेवकांमध्ये धाकधुक वाढलेली होती; पण निर्णय एक आठवडा पुढे गेल्याचे समजताच त्यांच्यावरील तणाव थोडा निवळला.

 

 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका