शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वि.स. खांडेकर व्याख्यानमाला, यशवंतरावांच्या राजकारणाला साहित्याची प्रेरणा : चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:52 IST

साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प्रेरणा होती, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सहदेव चौगुले यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देकरवीर नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित वि.स. खांडेकर व्याख्यानमालासाहित्यिक यशवंतराव चव्हाण विषयावर सहदेव चौगुले यांचे विवेचन

कोल्हापूर : साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प्रेरणा होती, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सहदेव चौगुले यांनी शुक्रवारी केले.करवीर नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत त्यांनी साहित्यिक यशवंतराव चव्हाण या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते.

चौगुले म्हणाले, राजकीय व्यक्तींनी साहित्यात लुडबूड करू नये, असा एक सूर असतो तो यशवंतरावांच्याही काळात होता.  मात्र, भिन्न मार्गांनी चालणारी ही दोन्ही माणसे समाज आणि मानवहित या एकाच उद्देशाने काम करत असतात. किंबहुना अनेक साहित्यिक राजकारणातही तितक्याच मुक्तपणे संचार करत असलेले आपल्याला दिसतात. सावरकर, नेहरू, गदिमा, अटलबिहारी वाजपेयी, एपीजे अब्दुल कलाम, डॉ. राधाकृष्णन अशा अनेक नेत्यांच्या साहित्यकृतीही तितक्याच दर्जेदार आहेत.ते म्हणाले, यशवंतरावांचे राजकीय गुणधर्म त्यांच्या साहित्यातही आढळतात. सामान्यजनांचे हित साधणारे माध्यम म्हणून त्यांनी साहित्याकडे पाहिले. मराठी साहित्यात माझी भूमिका वाचकांची आहे, असे म्हणणाऱ्या यशवंतरावांचा शब्दांच्या सामर्थ्य आणि सौंदर्यावर नितांत विश्वास होता. त्यांच्या प्रत्येक शब्दाला सामाजिक अर्थ आहे.

गेली ४० वर्षे मी यशवंतरावांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या साहित्यात आणि कृतीत प्रत्येकवेळी एक कसलेला राजकारणी साहित्यिकाच्या अंगाने उलगडताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर येतात.

डॉ. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित भोसले यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य