शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

Vidhan Sabha assembly election result 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आघाडीवर; आवाडे, यड्रावकर यांची विजयी वाटचाल

By समीर देशपांडे | Updated: November 23, 2024 10:57 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात सकाळी साडे दहापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १० जागांपैकी ८ जागांवर महायुती आघाडीवर आहे. उर्वरित दोन जागांवरील ...

कोल्हापूर : जिल्ह्यात सकाळी साडे दहापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १० जागांपैकी ८ जागांवर महायुती आघाडीवर आहे. उर्वरित दोन जागांवरील महाविकासची आघाडी ही फार मजबूत नाही अशी स्थिती आहे. कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आठव्या फेरीअखेर  ४ हजार मतांनी आघाडीवर होते. महायुती पुरस्कृत माजी मंत्री शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर हे आठव्या फेरीअखेर २२ हजारांचे मताधिक्य घेतले असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

Maharashtra Assembly Election Results

इचलकरंजीतून भाजपचे राहूल आवाडे शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे यांच्यापेक्षा सहाव्या फेरीअखेर  १६ हजार मतांनी पुढे होते. राधानगरीतून शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर हे उद्धवसेनेचे के. पी. पाटील यांच्यापेक्षा  सहाव्या फेरीअखेर ८ हजारांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक हे काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांच्यापेक्षा दहाव्या फेरीअखेर १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूर उत्तरमधून सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये शिंदेसेनेचे राजेश क्षीरसागर पिछाडीवर आहेत. परंतू ही मते आमदार सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील असल्याने नंतर लाटकर आपली आघाडी कायम ठेवतात की क्षीरसागर मुसंडी मारतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चंदगडमधून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अपक्ष शिवाजीराव पाटील आघाडीवर असून जनसुराज्य शक्तीचे संस्थापक विनय कोरे हे चौथ्या फेरीअखेर १६५१ मतांनी पिछाडीवर आहेत. परंतू नंतर ते वाढण्याची शक्यता आहे. करवीरमधून महायुतीचे चंद्रदीप नरके हे काँग्रेसचे राहुल पाटील यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलradhanagari-acराधानगरीkarvir-acकरवीरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024