शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विभागीय आयुक्तांनी केली मतदार याद्यांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:38 IST

मतदार यादीतील वगळण्यात आलेली नावे कोणत्या आधारे वगळली; त्यासाठी कोणते निकष लावले, काय पुरावे घेतले? अशी इत्थंभूत माहिती घेत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी सकाळी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात करवीर, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातील याद्यांची पडताळणी केली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनी केली मतदार याद्यांची पडताळणीमतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रांत कार्यालयाला भेट

कोल्हापूर : मतदार यादीतील वगळण्यात आलेली नावे कोणत्या आधारे वगळली; त्यासाठी कोणते निकष लावले, काय पुरावे घेतले? अशी इत्थंभूत माहिती घेत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी सकाळी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात करवीर, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातील याद्यांची पडताळणी केली.मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत डॉ. म्हैसेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय श्ािंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, आदी उपस्थित होते.सकाळी दहाच्या सुमारास डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील करवीर प्रांताधिकारी कार्यालय येथे भेट दिली. यावेळी म्हैसेकर यांनी मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे कशाच्या आधारे कमी झाली, याबाबत विचारणा केली. त्याकरिता कोणकोणते निकष लावले व कोणते पुरावे घेतले याची माहितीही त्यांनी घेतली.

सुमारे दोन तास त्यांनी या ठिकाणी थांबून यादीसंदर्भात इत्थंभूत माहिती घेतली. नवमतदारांबरोबरच दिव्यांग व तृतीयपंथी यांचे मतदार वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.त्याचबरोबर विमानतळ विस्तारीकरण, विविध धरण प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, आदींसाठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे लाभार्थ्यांना दिले जात आहेत का, याची विचारणाही यावेळी करण्यात आली. यावर उपलब्धतेनुसार संबंधितांना पैसे दिले जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

 

टॅग्स :Electionनिवडणूकcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर