शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :भाज्या घसरल्या; साखर उतरली, तूरडाळ वधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:53 IST

आठवडी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास सर्वच भाज्यांचे दर घसरले होते; तर दुसरीकडे, साखरेचा न झालेला उठाव, जुनी साखर शिल्लक आणि नवीन साखर बाजारात आल्याने साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात साखर ३६ रुपयांवरून ३४ रुपये प्रतिकिलो झाली. फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षे यांची आवक वाढल्याने त्याचे दर उतरले आहेत.

ठळक मुद्देभाज्या घसरल्या; साखर उतरली, तूरडाळ वधारली भोगीनिमित्त राळ्याच्या तांदळाला मागणी

कोल्हापूर :  आठवडी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास सर्वच भाज्यांचे दर घसरले होते; तर दुसरीकडे, साखरेचा न झालेला उठाव, जुनी साखर शिल्लक आणि नवीन साखर बाजारात आल्याने साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात साखर ३६ रुपयांवरून ३४ रुपये प्रतिकिलो झाली. फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षे यांची आवक वाढल्याने त्याचे दर उतरले आहेत.सौंदत्ती यात्रा आणि ओढ्यावरची रेणुका यात्रा झाल्याने रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी नव्हती. साधारणत: या आठवड्यात सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. कोबीचा गड्डा साडेपाच रुपये, वांगी २२ रुपये, ढबू मिरची १५ रुपये, घेवडा, कारली २० रुपये, भेंडी २५ रुपये, दोडका ३२ रुपये, फ्लॉवर १० रुपये, कोथिंबीर १० रुपये पेंढी, हरभरा पेंढी १० रुपये, तर टोमॅटो, ओला वाटाणा, मेथीचे दर स्थिर होते.

रविवारच्या आठवडी बाजारात पिवळीधमक व चवीला गोड अशी पपई आली आहे. तिच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.(छाया : नसीर अत्तार)फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. द्राक्षे ३० रुपये प्रतिकिलो, माल्टा ४५० रुपये चुमडे, तर बोरांचा दर स्थिर म्हणजे १२ रुपये किलो होता. याचबरोबर पपई, केळी, चिंच, क ैरी, किवी, टरबूज, रामफळ व स्ट्रॉबेरी यांचे दर ‘जैसे थे’ होते.

काही दिवसांत भोगी सण असल्यामुळे राळ्याच्या तांदळाला बाजारात मागणी वाढू लागली आहे. तो प्रतिकिलो १०० रुपयांच्या घरात गेला आहे. बन्सी गहू २८, आॅलिम्पिक ३४ रुपये, तांदूळ रत्नागिरी ४४ व ५० रुपये, बाजरी एक नंबर २८ रुपये झाली आहे. मात्र गेल्या १० ते १५ दिवसांत तूरडाळीच्या दरात वाढ होत आहे. पूर्वी ती ६८ रुपये होती. ती आता ७६ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. ड्रायफु्रटचे दर जैसे थे आहेत.

गूळ स्थिर; कांदा, बटाटा उतरलागेल्या आठवड्यात गुळाच्या रव्याचा बॉक्स ३५ रुपये होता, तोच दर या आठवड्यात होता. तो स्थिर होता; पण कांदा व बटाट्याच्या दरात घसरण झाली आहे. कांदा पाच रुपये, तर बटाटा १० रुपये किलो होता. कांद्यात दोन रुपयांची व बटाट्यामध्ये सात रुपयांची घसरण झाली आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर