शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

कोल्हापूर : प्रज्ञान कलाच्या वारणा नाट्यमहोत्सवास प्रतिसाद, दिलीप जगताप यांची नाटके सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:43 IST

वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित केलेल्या वारणा नाट्यमहोत्सवास नाट्यरसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महोत्सवात सांगली येथील नाट्यलेखक प्रा. दिलीप जगताप यांची दलदल (दिग्दर्शक पद्मनाभ पोवार) व बें बें बकरी (दिग्दर्शक अनिकेत ढाले) आणि अटक मटक, चवळी चटक (दिग्दर्शक नीलेश आवटी) ही बालनाट्ये सादर करण्यात आले.

ठळक मुद्दे प्रज्ञान कलाच्या वारणा नाट्यमहोत्सवास प्रतिसादवारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित नाट्यमहोत्सव

कोल्हापूर : वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित केलेल्या वारणा नाट्यमहोत्सवास नाट्यरसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहा निपुण कोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचा पडदा उघडला. दोन दिवसांच्या या नाट्यमहोत्सवात सांगली येथील नाट्यलेखक प्रा. दिलीप जगताप यांची दलदल (दिग्दर्शक पद्मनाभ पोवार) व बें बें बकरी (दिग्दर्शक अनिकेत ढाले) आणि अटक मटक, चवळी चटक (दिग्दर्शक नीलेश आवटी) ही बालनाट्ये सादर करण्यात आले.

वारणानगर येथील नाट्यमहोत्सवात सादर झालेल्या नाटकातील एक प्रसंग.महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रा. दिलीप जगताप यांनी वारणा बालवाद्यवृंदाचे स्मरण करत, प्रज्ञानच्या बालकलाकारांनी सादर केलेल्या बालनाट्याचे कौतुक केले. ग्रामीण नाट्यक्षेत्रात या नाटकांमुळे नव्या पर्वाची सुरुवात झाली असून ग्रामीण बालनाट्य चळवळीची ही नांदी आहे, असे मत व्यक्त केले.

मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या प्रा. दिलीप जगतापांची नाटके वारणेत सादर होणे हे अभिमानास्पद आहे व त्यादृष्टीने हा महोत्सव एक ऐतिहासिक घटना आहे, असे मत सचिव नीलेश आवटी यांनी व्यक्त केले. वारणा नाट्यमहोत्सवाची प्रेरणा ही तरुणपिढीला, शाळा-कॉलेजमध्ये नाट्यकला सादर करण्यास प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अध्यक्ष रमेश हराळे यांनी व्यक्त केला.यावेळी स्नेहल कुलकर्णी, विकास मिनेकर (दलदल) प्रणिता भिंताडे व धनंजय माने (बें बें बकरी) यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. अकादमी भविष्यात नाट्यमहोत्सव, चित्रपट महोत्सव भरविणार असल्याची माहिती समारोपप्रसंगी उपाध्यक्षा नेहा आवटी यांनी दिली. यावेळी केदार सोनटक्के यांच्या हस्ते कामगार कल्याण मराठी नाट्य स्पर्धेमध्ये प्रकाश योजनेत द्वितीय क्रमांक (दलदल) मिळविलेल्या विनायक सुतार यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी अमित माळी, प्रमोद कोरे, प्रा. टी. बी. राठोड, अनिल यादव, तानाजी शिंदे, वर्षा हराळे, माधवी आवटी, अंबिका चौगुले, हेमलता बोरकर, लक्ष्मण द्रविड, शुभांगी तावरे, अक्षय थोरात, तेजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक