शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

कोल्हापूर : मामाच्या गावात सुट्टीची धम्माल, शालेय मुला-मुलींची निघाली निसर्ग सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 16:35 IST

मामाच्या गावाला जाउया म्हणत, कोल्हापूर जिल्ह्यातील १00 शालेय मुला-मुलींनी शनिवारी सुट्टीची धम्माल केली. या निसर्ग सहलीत वारसास्थळांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ मुले अनुभवत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरातून या दोनदिवसीय सहलीला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देमामाच्या गावात सुट्टीची धम्माल, शालेय मुला-मुलींची निघाली निसर्ग सहलकोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी नाविण्यपूर्ण उपक्रमावर भर :चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : मामाच्या गावाला जाउया म्हणत, कोल्हापूर जिल्ह्यातील १00 शालेय मुला-मुलींनी शनिवारी सुट्टीची धम्माल केली. या निसर्ग सहलीत वारसास्थळांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ मुले अनुभवत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरातून या दोनदिवसीय सहलीला प्रारंभ झाला.हिलरायडर्स फौंडेशन, संवेदना सोशल फौंडेशन आणि कुतुहल फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रोत्साहनातून ११ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी ही मोफत सहल आयोजित करण्यात आली आहे.

मोबाईल, टीव्हीच्या जोखडातून मुलांची सोडवणूक करण्याच्या उद्देश्याने सुट्टीची धम्माल, मामाच्या गावाला जाऊया, आठवणीतील खेळ ही या सहलीची संकल्पना आहे. सहभागी मुला-मुलींशी गप्पा मारल्यानंतर विटी दांडू खेळून चंद्रकांत पाटील यांनी येथील हुतात्मा पार्कमधून या सहलीचा प्रारंभ केला. सहलीसाठी जाणाऱ्या दोन्ही गाडयांना पाटील यांनी श्रीफळ वाढवून सुरुवात केली.कार्यक्रमासाठी संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, हिलरायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, कुतुहल फौंडेशनचे अध्यक्ष सचिन जिल्हेदार तसेच निसर्ग मित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले, समिट अ‍ॅडव्हेंचर्सचे विनोद कांबोज आणि सुरज ढोली (गुरव) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी गेल्या चार वर्षात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम आयोजनावर भर दिला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, माणसांच्या पोटाच्या भुकेबरोबरच मन आणि बुध्दीची भूक भागविण्याच्या उद्देशाने या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.मुलांनी सकाळी हुतात्मा पार्क येथे शाहूकालीन माहिती घेतली. शाहुकालीन साठमारी, राज्यातील सर्वात उंच आणि देशातील दुसºया क्रमांकाचा ३0३ फुट उंचीचा तिरंगा ध्वज, पोलीस गार्डन येथे शस्त्रास्त्रांची पाहणी केल्यानंतर मुलांनी ऐतिहासिक शाहु जन्मस्थळास भेट दिली. टाऊन हॉल उद्यानातील कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची पाहणी करुन बागेतच दुपारचे भोजन घेतले.

दुपारनंतर आसुर्ले-पोर्ले येथील गुऱ्हाळघर आणि शेतशिवाराची पाहणी करुन मुलांनी सायंकाळी पन्हाळगडावर ताराराणीच्या राजवाड्यात मुक्काम केला. येथे पारंपारिक खेळ खेळुन रात्री टेलिस्कोपद्वारे कुतूहल फौंडेशनचे आनंद आगळगावकर यांनी आकाश निरिक्षण घडविले. मुला-मुलींच्या या दोन दिवसांच्या मोफत सहलीची अनिल चौगुले यांनी माहिती दिली.पन्हाळगडावर रविवारी पक्षीनिरिक्षण, खेळरविवारी सकाळी पन्हाळा येथे पक्षीनिरिक्षण, गडदर्शन, निसर्गदर्शनानंतर विठीदांडू, लगोरी, गोटया अशा अनेक पारंपारिक तसेच निसर्ग खेळांचा अनुभव मुले घेणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरातील हुतात्मा पार्क येथे या ऐतिहासिक सहलीचा समारोप होईल. या उपक्रमांतर्गत आता १२, १४, १६, १८ आणि २0 नोव्हेंबर २0१८ अशा सहा सहली होणार आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील