शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Kolhapur: प्राधिकरणास सवतीच्या पोराची वागणूक, मोठ्या अडथळ्यांची शर्यत; रडतकढतच कारभार सुरू

By भारत चव्हाण | Updated: May 30, 2023 17:07 IST

राज्यकर्त्यांनी आपली भूमिका अशीच कायम ठेवली तर पुढच्या शंभर वर्षांत या गावांचा विकास होईल, यावर विश्वास ठेवणे अशक्य

भारत चव्हाण कोल्हापूर : कोल्हापूर शहर व आसपासच्या ४२ गावांतील विकास सुनियोजित व सुनियंत्रित पद्धतीने करण्याच्या उद्देशाने २०१७ मध्ये कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना झाली; परंतु सरकारने ‘पोत्यात पाय बांधून पळायला’ सांगितल्यामुळे अजून हे प्राधिकरणच सुनियंत्रित झालेले नाही. स्थापनेसासून ‘सवतीचे पोर’ बनलेल्या प्राधिकारणाचा कारभार अनेक अडथळ्यांना समोरे जात रडतकढत सुरू आहे. राज्यकर्त्यांनी आपली भूमिका अशीच कायम ठेवली तर पुढच्या शंभर वर्षांत या गावांचा विकास होईल, यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे.कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या विषयावर दोन्ही बाजूंच्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा एक गोंड्स पर्याय पुढे आला. कोणाची मागणी नसताना विकासाच्या ‘जादूची कांडी’ असल्याचे भासवून हे प्राधिकारण कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर लादण्यात आले. हद्दवाढ समर्थक व विरोधक यांनी या जादूच्या कांडीवर विश्वास ठेवून प्राधिकरणाचा स्वीकार केला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हेतू काहीही असला तरी मागच्या सहा वर्षांचे प्राधिकरणाचे ‘प्रगतिपुस्तक’ पाहता हा हेतू फसला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून सरकारने त्यास कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे केवळ विकास परवानगी देण्यापलीकडे प्राधिकरणाचे पाऊल पुढे गेलेले नाही.मुळात हे प्राधिकरण राज्यातील इतर शहरांत स्थापन केलेल्या महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर आधारित नाही. एखादे शहर आणि आसपासच्या गावांसाठी मिळून केलेले क्षेत्र विकास प्राधिकरण ही राज्यातील पहिलीच संकल्पना आहे. यापूर्वी शहरांतर्गत रस्त्यांना टोल आकारण्याचा प्रयोग प्रथम कोल्हापूर शहरात केला, तशातलाच हा प्रकार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने कशा प्रकारे काम करावे, हे जरी स्पष्ट असले, तरी सरकारने त्यास कशा पद्धतीने मदत करावी, याबाबतचे निश्चित धोरण ठरलेले नाही.

अशी आहे प्राधिकरणाची रचनापदसिद्ध अध्यक्ष - पालकमंत्रीसदस्य सचिव - उपसंचालक नगररचना, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण.पदसिद्ध सदस्य - जिल्हा परिषद अध्यक्ष, कोल्हापूर महापौर, करवीर पंचायत समिती सभापती, हातकणंगले पंचायत समिती, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक, प्राधिकरणाने सुचविलेले तीन तज्ज्ञ व्यक्ती अथवा लोकप्रतिनिधी.

प्राधिकरणात समाविष्ट गावेकरवीर तालुका - शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, वळिवडे गांधीनगरसह, चिंचवाड, मुडशिंगी नवे वाडदेसह सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळशिरगाव, कणेरी, कंदलगाव, पाचगाव, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, मादळे, सादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगिल खुर्द, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव,हातकणंगले - टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली (एमआयडीसी वगळून)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर