शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘शालिनी’ची इमारत पूर्ववत करून घ्या,  हेरिटेज कमिटीची सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:34 IST

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची साक्ष देणाऱ्या शालिनी सिनेटोनची इमारत सन २००३ मध्येच ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली होती, अशी इमारत विना परवाना पाडणे हा गुन्हा असून संबंधितांकडून इमारत पूर्ववत करून घ्यावी, अशी सूचना हेरिटेज कमिटीने महापालिकेला केली आहे.

ठळक मुद्देशालिनी सिनेटोनची इमारत २००३ मध्येच ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित डिसेंबर २०१६ पर्यंत प्रकरण न्यायालयात संबंधितांकडून इमारत पूर्ववत करून घ्या, हेरिटेज कमिटीने महापालिकेला केली सूचना

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची साक्ष देणाऱ्या शालिनी सिनेटोनची इमारत सन २००३ मध्येच ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली होती, अशी इमारत विना परवाना पाडणे हा गुन्हा असून संबंधितांकडून इमारत पूर्ववत करून घ्यावी, अशी सूचना हेरिटेज कमिटीने महापालिकेला केली आहे.

आता पुन्हा एकदा आयुक्तांनी वास्तूला हेरिटेजच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी इमारत पूर्ववत करून देण्याचा मुद्दा प्रश्नांकित राहणार आहे.अक्कासाहेब महाराजांनी स्थापन केलेल्या शालिनी सिनेटोनचा परिसर हा देवासच्या महाराजांची खासगी संपत्ती असली त्या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असल्याने तिचा वापर योग्य त्या कारणासाठीच होणे अपेक्षित आहे.

महापालिकेने सन २००३ मध्ये झालेल्या महासभा ठरावात शालिनी सिनेटोनच्या वास्तूचा समावेश हेरिटेज यादीत करण्याचा निर्णय झाला. त्यावर हरकत मांडण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली. त्यावेळी देवासच्या तुकोजीराव पवार महाराजांनी कोणतीही हरकत नोंदवली नाही. त्यानंतर वास्तूचा महापालिकेच्या अंतिम हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला.

तत्पूर्वी देवासच्या महाराजांकडून हमीपत्र घेण्यात आले होते. मात्र, २००७ मध्ये ही इमारत विनापरवाना पाडण्यात आली, तेव्हापासून डिसेंबर २०१६ पर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे.

आता तुकोजीराव पवार हयात नाहीत त्यामुळे त्यांनी दिलेले वटमुखत्यार अवैध ठरले आहे. हेरिटेज कमिटीनेही न्यायालयात आपले म्हणणे मांडताना संबंधितांवर गुन्हा दाखल करून इमारत पूर्ववत करून घ्यावी, असे म्हटले होते.शालिनी सिनेटोनच्याबाबत महापालिकेने चार-पाच दिवसांपूर्वी हेरिटेज कमिटीला म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यात समितीने वास्तू पूर्वीपासून हेरिटेजमध्ये आहेच त्यामुळे ती विनापरवाना पाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून संबंधितांकडून वास्तू पूर्ववत करून घ्यावी, अशी सूचना मांडली आहे.

शालिनी सिनेटोनची इमारत सन २००३ मध्येच ‘संरक्षित वास्तू’ म्हणून जाहीर झाली होती. आता पुन्हा त्यासंबंधीचा अध्यादेश काढला असला तरी संबंधितांनी इमारत पूर्ववत करून द्यावी, असे आमचे म्हणणे आहे. पुढे मग त्या वास्तूचा वापर चित्रपट संग्रहालय किंवा अन्य कारणांसाठी करता येणे शक्य आहे.- उदय गायकवाड,सदस्य हेरिटेज कमिटी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका