शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कोल्हापूर : पावसाळ्यात विजेबाबत दक्षता आवश्यक, कारणे समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 11:40 IST

पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (ग्रीड) देशात पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते, असा बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.

ठळक मुद्देपावसाळ्यात विजेबाबत दक्षता आवश्यक, कारणे समजून घ्या पुरवठा खंडित झाल्यास ‘टोल फ्री’ वर चौकशी करा

कोल्हापूर : पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (ग्रीड) देशात पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते, असा बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.तारेच्या जाळ्यातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज असो, दोन्ही मध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण उच्चदाबामुळे ते जळण्याची शक्यता असते.

दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते. वीज खांबात वीजपुरवठा उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात.

हे इन्सुलेटर उन्ह किंवा वीजप्रवाहामुळे गरम झालेले असतात. त्यातच त्यावर पावसाचे थेंब पडले की, त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. अन लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो.

जर हा फिडर बंद पडला नाही तर जीवित अथवा वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फिडरला ब्रेकरची व्यवस्था केलेली असते. जेव्हा-केव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात.

वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन-वाऱ्याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोधमोहीम हाती घेतली जाते. वेळप्रसंगी बंद पडलेल्या वाहिनीचे सर्व खांब चढून तपासावे लागतात तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पुरी यांनी दिली.

वीजपुरवठा खंडित झाल्यास येथे तक्रार करावीजपुरवठा खंडित झाल्यास पाच ते दहा मिनिटे थांबून ‘महावितरण’च्या टोल फ्री क्रमांकाला दूरध्वनी करावा. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कंपनीने १९१२, १८००० २३३ ३४३५ व १८०० १०२ ३४३५ या तीन टोल फ्री क्रमांकाची सुविधा कंपनीने केली आहे.

मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. आलेल्या तक्रारी विशिष्ट अशा संगणकीय प्रणालीमार्फत संबंधित जनमित्र व अभियंत्यांमार्फत पोहोचवून त्याचे तातडीने निराकरण केले जाते. ‘महावितरण’च्या मोबाईल अ‍ॅपमधूनही विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदविता येतात, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.

अशी घ्या दक्षता

  1. * आपल्या घरात ‘ईएसीबी स्वीच’असणे गरजेचे आहे.
  2. * अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
  3. * वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
  4. * वीज उपकरणे हाताळताना पायात स्लीपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
  5. * विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
  6. * विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारू नयेत.
  7. * बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.
  8. * विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. त्याची माहिती तातडीने वीज कंपनीला द्यावी.
  9. * नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, वीज मीटरबाबत विशेष दक्षता घ्यावी.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरण