शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वाकरे फाट्याजवळ कळंबेतील दुचाकीस्वारास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:37 IST

वाकरे (ता. करवीर) फाटा येथे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी दुचाकीस्वाराचा मोबाईल व पैसे असे एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना २५ आॅक्टोबरला घडली. याबाबतची फिर्याद श्रीकांत महादेव पाटील (वय ३८, रा. कळंबे तर्फ कळे, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत बुधवारी (दि. ३१) रात्री दिली.

ठळक मुद्देवाकरे फाट्याजवळ कळंबेतील दुचाकीस्वारास लुटले हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद

कोल्हापूर : वाकरे (ता. करवीर) फाटा येथे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी दुचाकीस्वाराचा मोबाईल व पैसे असे एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना २५ आॅक्टोबरला घडली. याबाबतची फिर्याद श्रीकांत महादेव पाटील (वय ३८, रा. कळंबे तर्फ कळे, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत बुधवारी (दि. ३१) रात्री दिली.पोलिसांनी सांगितले की, उचगाव (ता. करवीर) येथे श्रीकांत पाटील हे एका औद्योगिक कंपनीत कामास आहेत. २५ आॅक्टोबरला त्यांची दुपारी चार ते रात्री १२ अशी शिफ्ट होती. शिफ्ट झाल्यावर ते दुचाकीवरून कोल्हापूर-गगनबावडामार्गे घरी जात होते.

याचवेळी दुचाकीवरून तिघे तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी दुचाकी आडवी मारून श्रीकांत पाटील याला अडविले. त्यांना दमदाटी करून त्यांच्या खिशातील मोबाईल व पैशाचे पाकीट बळजबरीने घेऊन ते पसार झाले. मोबाईल व चार हजार रुपये, पॅनकार्ड, वाहन परवाना, एटीएम, असा सुमारे ११ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर