शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दक्षता सप्ताहातच घरफाळा विभागातील दोन लाचखोर सापडले, एसीबीची कारवाई

By उद्धव गोडसे | Updated: November 2, 2023 21:24 IST

Kolhapur News: महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक तीनमधील घरफाळा विभागात कार्यरत असलेले दोन मुकादम लिपिक साडेतीन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले.

- उद्धव गोडसेकोल्हापूर - महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक तीनमधील घरफाळा विभागात कार्यरत असलेले दोन मुकादम लिपिक साडेतीन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले. शेखर अरुण पाटील (वय २६, रा. माने गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि रोहित विनायक जाधव (वय ३२, रा. तस्ती गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) अशी अटकेतील लाचखोर कर्मचा-यांची नावे आहेत. तक्रारदाराने खरेदी केलेल्या मालमत्तेची घरफाळा पत्रकावर नोंद करण्यासाठी कर्मचा-यांनी लाच स्वीकारली. ही कारवाई गुरुवारी (दि. २) सायंकाळी राजारामपुरी येथील कार्यालयात झाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने राजारामपुरी परिसरात नवीन घर खरेदी केले होते. या मालमत्तेची महापालिकेच्या घरफाळा विभागात नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. मालमत्ता नोंद करण्यासाठी मुकादम लिपिक शेखर पाटील याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने गुरुवारी राजारामपुरी विभागीय कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना शेखर पाटील आणि मध्यस्थ मुकादम लिपिक रोहित जाधव या दोघांना पथकाने अटक केली. अटकेतील दोन्ही लाचखोरांच्या घरांची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपअधीक्षक नाळे यांच्यासह निरीक्षक बापू साळुके, हवालदार विकास माने, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, पूनम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरण