शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तुळशी धरण भरले, नदीपात्रात ११६४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:09 IST

धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात  तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला.

ठळक मुद्दे३४ वर्षात प्रथमताच जुलै मध्ये धरण भरल्याची नोंद

श्रीकांत ऱ्हायकरकोल्हापूर/धामोड  : धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात  तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला.

दुपारी बारा वाजुन पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान धरणाच्या तिन्ही वक्र दरवाजातुन ११६४ क्युसेक्स इतक्या वेगाने तुळशी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने व पावसाचा जोर कायम राहिल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.प्रारंभी पाण्याचे पुजन सहायक अभियंता श्रेणी १चे रोहीत बांदिवडेकर व एन .जी. नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळ पासुनच तुळशी धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.

सायंकाळी ४ वाजेपर्यंत ६८ मिली मिटर इतका पाऊस झाला असुन, दुपारी १२ .४५ च्या दरम्यान धरणाच्या तिन्ही वक्रदरवाजातून प्रतिसेकंद ११६४ इतक्या वेगाने पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले. गतसालच्या तुलनेत धरण परिसरात दुप्पट पावसाची नोंद झाली आहे . यावर्षी आजआखेर २३१८ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.धरण बांधणीच्या इतिहासात प्रथमतःच माहिनाभर अगोदरच धरण भरल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला आहे.

येत्या कांही दिवसात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता शिवाजी कळके यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. यावेळी उपअभियंता एस .एम. गुरव, एम.के. पाटील, ईश्वरा पाटील, बाळासो मगदूम, पांडूरंग मगदूम, महादेव देवार्डेकर आदी उपस्थित होते . 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर