शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कोल्हापूर : ‘बाबूजमाल’ची खाई फोडण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:05 IST

मोहरमच्या नवव्या दिवशी सायंकाळी शहरातील अनेक पीरपंजांनी सवाद्य मिरवणुकीने येऊन बाबूजमाल तालमीतील हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाच्या भेटी घेतल्या. यावेळी परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर भक्तांनी मलिद्याचा नैवेद्य दिला.

ठळक मुद्देआजही काही ठिकाणी खत्तल रात्र पीरपंजे भेटी पाहण्यास गर्दी : आज व उद्या ताबूत विसर्जन

कोल्हापूर : मोहरमच्या नवव्या दिवशी सायंकाळी शहरातील अनेक पीरपंजांनी सवाद्य मिरवणुकीने येऊन बाबूजमाल तालमीतील हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाच्या भेटी घेतल्या. यावेळी परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर भक्तांनी मलिद्याचा नैवेद्य दिला.

खत्तल रात्रीनिमित्त रात्री बाबूजमाल दर्गासह काही ठिकाणी खाई फोडण्याच्या कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला. शहरातील शिवाजी रोडवरून विविध पीरपंजे घुडणपीर, बाबूजमाल, बाराईमामच्या भेटीला रात्री उशिरापर्यंत जात होते.

कोल्हापुरात बाबूजमाल दर्गा येथे खत्तलरात्रीनिमित्त खाई फोडण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)

मुस्लिम धर्मातील पवित्र मोहरमनिमित्त बुधवारी दिवसभर शिवाजी चौकातील घुडणपीर, बाराईमाम, बाबूजमाल तालीम येथील हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाला भक्तांनी वस्त्र चढवले. तसेच मलिदा, भाकरी, वडी, भाजी नैवेद्य दिला जात होता.

सायंकाळी शहरातील विविध पीरपंजे हालगीच्या ठेक्यात तसेच पारंपरिक वाद्यात हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाला भेटीला येत होते. त्यामुळे बाबूजमाल तालीम परिसरात भक्तांची अलोट गर्दी होती. हजरतपीर नाल्या हैदर कलंदरचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या; तर विद्युत रोषणाई व खेळण्यांनी परिसर फुलून गेला होता. यासाठी तालीम मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत होते.शहरात बाबूजमाल दर्गासह मंगळवार पेठेतील अवचीतपीर तालीम, सणगर गल्ली-बोडके गल्ली तालीम, शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम, आदी ठिकाणी खत्तल रात्रीनिमित्त खाई फोडण्याचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडला.पीरपंजे, गणेश देखावे पहाण्यासाठी रस्ते फुल्लयंदाच्या वर्षी गणेशोत्सव आणि मोहरम हे हिंदू-मुस्लिम धर्मियांचे पवित्र सण एकाचवेळी आल्याने दोन्हीही समाजातील बांधव पीरपंजे व गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी बाहेर पडल्याने शिवाजी रोड, गुजरी, महाद्वार रोड परिसरात मोठी गर्दी दिसून येत होती.दोन दिवस खत्तल रात्र व ताबूत विसर्जनखत्तल रात्र आणि ताबूत विसर्जनबाबत अनेक मुस्लिम बांधवांमध्ये संभ्रमावस्था कायम राहिली. बुधवारी खत्तलरात्र मानून शहरातील काही दर्गामध्ये खाई फोडण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यांचे आज, गुरुवारी सायंकाळी ताबूत विसर्जन होणार आहे. तर चंद्रदर्शनवरून काही ठिकाणी आज, गुरुवारी खत्तल रात्र मानून खाई फोडण्याचा कार्यक्रम होत आहे.

त्यामध्ये घुडणपीर दर्गा, बाराईमाम, दिलबहार तालीम, नंगीवली दर्गा, केसापूर गल्लीतील कागदी मश्जीद, लक्ष्मीपुरीतील गरीब शहा, शाहू मिल परिसरातील झिमझीम साहेब, शिवाजी विद्यापीठ परिसरातील महाबूत वाणी दर्गा यांचा समावेश आहे. त्यांचे ताबूत विसर्जन उद्या, शुक्रवारी होणार आहे. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर