शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : नातीवर अत्याचार, आजोबाला जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 13:04 IST

  कोल्हापूर : कनाननगर येथे घरात कोणी नसल्याचे पाहून ११ वर्षांच्या नातीवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व ...

ठळक मुद्देनातीवर अत्याचार, आजोबाला जन्मठेपकोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

 

कोल्हापूर : कनाननगर येथे घरात कोणी नसल्याचे पाहून ११ वर्षांच्या नातीवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांनी नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी गणपती भाऊ आदमाने (वय ६५, रा. रांगोळी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आई-वडील व लहान भाऊ यांच्यासमवेत कनाननगर येथे राहते. वडील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गजरे, फुले; तर आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. दरम्यान, रांगोळी येथे राहणारा आजोबा गणपती आदमाने हा १५ सप्टेंबर २०१६ रोजी गणेशोत्सव काळात कनाननगर येथे राहण्यास आला होता. १९ सप्टेंबरला आई-वडील व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते. मुलगी व आजोबा असे दोघेच घरी होते. यावेळी दुपारी ती झोपलेली पाहून आजोबाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीला घरी कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीने मुलीने घडलेला प्रकार सांगितला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही तिच्यावर अत्याचार केला. रात्री आई-वडील घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे दिसून आले. त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या जीविताला धोका असल्याने अखेर मुलीच्या आईने सासºयाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित नराधम आदमाने याला रांगोळी येथील घरातून अटक केली. या प्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. पीडित मुलीची आई आणि अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील विक्रम बन्ने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी आदमाने याला लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ५ व ६ अन्वये जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.--------------------

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर