शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सायरन वाजताच चोरट्यांचे पलायन, भरदिवसा बँक फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:32 IST

गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे.

ठळक मुद्दे सायरन वाजताच चोरट्यांचे पलायन, नागरिकांत भीतीचे वातावरण गणेशवाडीतील राष्ट्रीयीकृत बँक भरदिवसा फोडण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे. बँक फोडण्याचा प्रयत्न होऊनही पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नागरिकांत भीती पसरली आहे.अधिक माहिती अशी, गणेशवाडी येथील प्रताप चंद्रकांत पाटील यांच्या गाळ्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून एका राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. शाखाधिकारी सुरेश अशोक देसाई (वय ४४, रा. मिणचे सावर्डे, ता. हातकणंगले) हे शनिवारी, २१ जुलैला चार वाजता बँक बंद करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी रविवारी २२ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास अचानक बँकेचा सायरन वाजला. तो एकसारखा वाजू लागल्याने शेजारील लोकांनी बँकेचा शिपाई एकनाथ माने (रा. गणेशवाडी) यांना फोनवरून माहिती दिली. माने तत्काळ बँकेत आले असता बँकेचे शटर उचकटलेले होते. आतमध्ये लोखंडी पहार पडली होती.

चोरीचा संशय आल्याने त्यांनी व्यवस्थापक सुरेश देसाई यांना बोलावून घेतले. देसाई यांनी बँकेत येऊन पाहणी केली असता बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज वाकविलेले दिसले. तेथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आत जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र बँक बंद असताना शटर उघडल्यानंतर आतमध्ये कोणीही गेले असता सायरन वाजतो. नेमका त्याच वेळी सायरन वाजल्याने चोरट्यांनी लोखंडी पहार जागेवर टाकून पोबारा केला. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये चोरटे दिसून येत नाहीत.

नऊ दिवसांनी फिर्यादचोरीच्या प्रकारानंतर बँकेचे व्यवस्थापक सुरेश देसाई, गणेशवाडी, सावरवाडी आणि बीडशेड येथील पोलीस पाटलांनी करवीर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी ठाणे अंमलदारांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सर्व पोलीस नंदवाळ येथील आषाढी एकादशी यात्रेला बंदोबस्तासाठी गेले आहेत. त्यामुळे तिकडे येण्यासाठी कोणी उपलब्ध नाही. तुम्हाला आम्ही फोन केल्यानंतर या, असे सांगून त्यांना परत पाठविले. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी चोरीची फिर्याद दाखल करून घेतली.बावीस लाखांची रोकडबँकेतील तिजोरीत सुमारे २२ लाखांची रोकड होती. त्याचा सुगावा चोरट्यांना लागळा असण्याची शक्यता आहे. भरदिवसा बँक फोडण्याचा प्रयत्न झाला असताना सायरन वाजल्याने चोरटे लोखंडी पहार जागेवर टाकून पळून गेले. ते आसपासच्या परिसरातीलच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर