शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बार असोसिएशनमध्ये तीन पॅनेल शक्य, अर्जांनंतर प्रचाराला गती ; १५ ला मतदान, निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 12:03 IST

वकीलबांधवांची जिल्ह्यातील शिखरसंस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीमध्ये तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. बार असोसिएशनची निवडणूक तीन माजी अध्यक्ष तीन पॅनेल करून लढवण्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे सोमवार (दि. ११) व मंगळवारी (दि. १२) अर्ज भरल्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने गती येणार आहे.

ठळक मुद्देबार असोसिएशनमध्ये तीन पॅनेल शक्य उमेदवारी अर्जांनंतर प्रचाराला गती ; १५ ला मतदान, निकाल

कोल्हापूर : वकीलबांधवांची जिल्ह्यातील शिखरसंस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीमध्ये तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. बार असोसिएशनची निवडणूक तीन माजी अध्यक्ष तीन पॅनेल करून लढवण्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे सोमवार (दि. ११) व मंगळवारी (दि. १२) अर्ज भरल्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने गती येणार आहे.सध्या सभासद नोंदणी सुरू आहे. मंगळवारअखेर सुमारे ११०० सभासद झाले होते. मतदार सभासद नोंदणीचा आज, बुधवार अंतिम दिवस आहे. यासाठी १५ ला सकाळी मतदान तर सायंकाळी सहानंतर मतमोजणी होणार आहे. याच दिवशी रात्री निकाल लागणार आहे.जिल्हा बार असोसिएशनची दरवर्षी जूनमध्ये निवडणूक होते. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत तीन पॅनेल झाली होती. यंदाही तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे तीन हजार वकील आहेत. सभासदालाच या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे.

उन्हाळी सुटीनंतर गेले दोन दिवस वकील बांधवांची रेलचेल सुरू आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील तीनही पॅनेल संभाव्य उमेदवार सध्या चाचपणी करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निवडणुकीची सूत्रे माजी अध्यक्षांच्या हाती आहेत.रविवारी (दि. १०) कच्ची मतदार यादी प्रसिद्ध व त्यावरील हरकती तर सोमवार (दि. ११) दुपारी ४ वा.पक्की मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ही निवडणूक अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सेक्रेटरी आदी १५ जागांसाठी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वकिलांच्या वैयक्तिक व तालुकास्तरावरील गाठी-भेटींना वेग येणार आहे.

त्याचबरोबर तिन्ही माजी अध्यक्ष प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने ते आपले पॅनेल निवडून येण्यासाठी ताकद पणाला लावणार हे निश्चित. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. सुभाष पिसाळ हे काम पाहत आहेत. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर