शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : थरारक पाठलाग करून तिघा चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:36 IST

माळी कॉलनी, टाकाळा येथे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास थरारक दुचाकीचा पाठलाग करून तिघा सराईत चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने पकडले.

ठळक मुद्देथरारक पाठलाग करून तिघा चोरट्यांना अटकचार घरफोड्यांची कबुली : चार लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : माळी कॉलनी, टाकाळा येथे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास थरारक दुचाकीचा पाठलाग करून तिघा सराईत चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने पकडले.

ऋतुराज ऊर्फ डेज्या विनायक इनामदार (वय २२, रा. जोशी गल्ली, विक्रमनगर), अमित सर्जेराव देवमाने (२३, रा. मारुती मंदिरजवळ, रुईकर कॉलनी), रविराज महेश कसबेकर (२२, रा. टेंबलाईनाका झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून कार, दोन दुचाकी, टीव्ही, कुकर, गॅस टाकी, घड्याळे असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.याबाबतची अधिक माहिती अशी, मानस अपार्टमेंट, माळी कॉलनी, टाकाळा येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी गॅस टाकी, घड्याळ, टॅब व रोखतीन हजार रुपये असा सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

याप्रकरणी स्वप्निल विजयकुमार महाजन (वय २८) यांनी राजारामपुरी पोलिसांत शुक्रवारी (दि. १७) फिर्याद दिली होती. वाढत्या घरफोडीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार शांतिनाथ हुंडुरके, हवालदार अशोक पाटील, संजय जाधव, निवास पाटील, अमोल अवघडे, गौरव चौगुले असे गुन्हे पथक शनिवारी पहाटे चारच्या सुमारास माळी कॉलनी येथे गस्त घालत असताना नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिघे संशयितरीत्या फिरताना दिसून आले.

पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते भरधाव पळून जाऊ लागले. यावेळी त्यांचा थरारक पाठलाग करून माळी कॉलनी येथील स्विमिंग टँकसमोर त्यांना पकडले. पोलीस ठाण्यात खाकीचा प्रसाद देताच त्यांनी घरफोड्यांची कबुली दिली.

गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. अशा सुमारे चार घरफोड्या व दुचाकी चोरीची कबुली त्यांनी दिली. त्यांच्या ताब्यातून कार, दोन दुचाकी, गॅस टाकी, टॅबलेटस, मनगटी घड्याळे, टीव्ही, कुलर, डिव्हीडी प्लेअर, मिक्सर, असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर