कोल्हापुरात हजारामागे ९२५ मुली, ‘मुलगी वाचवा’ कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:49 AM2020-03-04T05:49:52+5:302020-03-04T05:49:59+5:30

देशभर स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून ओळख मिळविलेल्या कोल्हापुरातच आता कुणी तरी इथल्या मुली वाचवा हो,

In Kolhapur, there are 925 girls behind the thousand, 'Save the girl' on paper | कोल्हापुरात हजारामागे ९२५ मुली, ‘मुलगी वाचवा’ कागदावरच

कोल्हापुरात हजारामागे ९२५ मुली, ‘मुलगी वाचवा’ कागदावरच

googlenewsNext

नसिम सनदी
कोल्हापूर : देशभर स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून ओळख मिळविलेल्या कोल्हापुरातच आता कुणी तरी इथल्या मुली वाचवा हो, अशी हाक देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर पाच वर्षांच्या नीचांकावर पोहोचला असून, लिंगगुणोत्तर प्रमाण १००० मुलांमागे ९२५ मुली असे झाले आहे.
कोल्हापूरसारख्या सधन जिल्ह्यातच मुलींचे प्रमाण घटत चालल्याने मुलगी वाचवा अभियानाला ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दरवर्षी लिंगगुणोत्तर प्रमाण जाहीर करतो. डिसेंबर २०१९ मधील वार्षिक आकडेवारीनुसार आजच्या घडीला १००० मुलांमागे ९२५ मुली असे प्रमाण झाले आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण ९३३ इतके होते. गेल्या पाच वर्षांत सातत्याने मुलींचा जन्मदर वाढत असतानाच या वर्षी मात्र त्याला अचानक ब्रेक लागला आहे. ही धोक्याची घंटा समजली जात आहे.
करवीरमध्ये सर्वांत कमी मुली
जिल्ह्यातील सर्वांत सधन व शहरानजीकचा तालुका असलेल्या करवीरमध्येच मुलींचे प्रमाण सर्वांत कमी आहे. ८९५ मुली असे प्रमाण आहे. याउलट डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या दुर्गम अशा चंदगड, गगनबावडा तालुक्यांत मुलींचा जन्मदर सर्वांत चांगला आहे.
चंदगडमध्ये एक हजार मुलांमागे ९८१ इतके प्रमाण दिसते. गगनबावडा तालुक्यात ९७८ आहे. हातकणंगले ९४९, शाहूवाडी ९४७, आजरा ९३६, गडहिंग्लज ९३३, कागल ९२०, भुदरगड ९१९, पन्हाळा ९०७, शिरोळ ९०५, राधानगरी ९०१ असे प्रमाण यावर्षी दिसत आहे.

Web Title: In Kolhapur, there are 925 girls behind the thousand, 'Save the girl' on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.