शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : टोमॅटो दहा रुपयांना दीड किलो, वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीत, भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 11:27 IST

वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही.

ठळक मुद्देटोमॅटो दहा रुपयांना दीड किलो वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीतभाजीपाल्याच्या दरात घसरण

कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे.  बाजारात टोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे.

बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही. गेले आठ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस येत असला तरी वातावरणातील उष्मा काही कमी नाही. उष्मा रोज वाढतच जात असल्याने शीतपेयांची मागणी वाढली आहे.

विशेष करून सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या व शरीरास पोषक असणाऱ्या लिंबू सरबताला थोडी जादाच मागणी आहे. त्यामुळे लिंबंूची मागणी वाढली असून आठवड्यात दोन रुपयांवरून पाच रुपयांपर्यंत लिंबू पोहोचला आहे.

फळबाजारात संत्री, सफरचंद, द्राक्षे, चिक्कू, कलिंगडांची रेलचेल असून उठावही असल्याने दरात फारसा चढउतार दिसत नाही. कलिंगडांची आवक जास्त सुरू असून सरासरी दहा ते वीस रुपये नग असा दर आहे. द्राक्षे ५० रुपये किलो, तर चिक्कू २० पासून ५० रुपये किलोपर्यंत दर आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण सुरू आहे. किरकोळ बाजारात वांगी, ढबू २० रुपये किलो, तर गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, दोडका तीस रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

काकडीची आवकही वाढत आहे. परिणामी दरांत हळूहळू घसरण सुरू असून साधारणत: तीस ते चाळीस रुपये किलो दर आहे. मेथी, कोथिंबीर, पोकळा, पालकाची आवक स्थिर असल्याने दरात चढउतार दिसत नाही.पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुळाला असणारी मागणी थोडी कमी झाली असून साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. कडधान्य, डाळीचे दर स्थिर आहेत. कांदा-बटाट्याचे दर स्थिर असून लसणाच्या दरात मात्र थोडी घसरण झाली आहे.

हापूसची आवक वाढलीकोल्हापूर बाजार समितीत हापूस आंब्याची आवक वाढली असून रोज दीड हजार बॉक्स कोकणासह कर्नाटकातून येत आहेत. घाऊक बाजारात सरासरी ७५० रुपये बॉक्स, तर १८०० रुपये पेटीचा दर राहिला आहे.

टोमॅटो दहा रुपयांना दीड किलोटोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार