शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कोल्हापूर देवस्थान समितीने किरणोत्सवातील अडथळे हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:52 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव जगभरातील भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. मोजक्या इमारतींच्या काही भागांमुळे देवीच्या किरणोत्सवात अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेने हे अडथळे काढून मिळकतदारांना नुकसानभरपाई द्यावी, महापालिकेला ते शक्य नसेल तर देवस्थान समिती नुकसानभरपाई देईल, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी जाहीर केले. ...

ठळक मुद्दे पालिकेस शक्य नसल्यास नुकसानभरपाई देऊदेवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सर्व कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव जगभरातील भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. मोजक्या इमारतींच्या काही भागांमुळे देवीच्या किरणोत्सवात अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेने हे अडथळे काढून मिळकतदारांना नुकसानभरपाई द्यावी, महापालिकेला ते शक्य नसेल तर देवस्थान समिती नुकसानभरपाई देईल, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी जाहीर केले. दरम्यान, सकाळी किरणोत्सवात बाधा ठरणाºया इमारती, बोर्ड, पत्र्याच्या छपरी, वीजेच्या वायरी असे शक्य तितके अडथळे शुक्रवारी देवस्थान समितीच्यावतीने काढण्यात आले.

अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळे काढण्यात मनपा कर्मचाºयांनी स्वारस्य दाखविले नाही. अखेर गुरुवारी झालेल्या किरणोत्सवानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी देवस्थान समितीच्या वतीने अडथळे काढण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे जाहीर केले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, विजय पोवार, एस. एस. साळवी, प्रशांत गवळी, सुदेश देशपांडे यांच्यासह देवस्थान समितीचे कर्मचारी महाद्वार रोडवर आले. सर्वांनी इमारतधारकांना सूचना केली. काहीजणांनी स्वत:हून अडथळे काढले. दुसरीकडे देवस्थान अध्यक्षांसह सर्व कर्मचाºयांनी अडथळे हटविण्यास सुरवात केली. वैद्य यांची इमारत, आगळगावकर, मिणचेकर इमारतींचे दोन फुटांचे कट्टे, डिजिटल फलक, असे अडथळे हटविले.

दरम्यान, अध्यक्ष महेश जाधव यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना महापालिकेने अडथळे हटविण्यासंबंधी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा संबंधित अधिकाºयांबाबत कठोर पाऊल उचलले जाईल, असा इशाराही दिला.कर्मचारीचआले नाहीत...काही मिळकतधारकांनी देवस्थानच्या पदाधिकाºयांना सांगितले की आम्ही यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाºयांना करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सवात येणार अडथळे काढण्यासाठी सहमती दिली होती.मात्र महापालिकेच्या प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले परिणामी येथील अडथळे काढण्यास कर्मचारीच आले नाही.सूर्यकिरणे मूर्तीच्या खांद्यापर्यंतकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात शुक्रवारी सूर्यकिरणे मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने किरणोत्सव मार्गातील काही अडथळे काढल्याने एरव्ही मूर्तीच्या डावीकडे वळणाºया किरणांची दिशा सरळ होती. त्यामुळे किरणे पूर्ण मूर्तीवर पसरली होती. थंडीचे दिवस असले सूर्यास्त लवकर होत असला तरी बुधवारपासून सुरू असलेला अंबाबाईचा किरणोत्सव तिसºया दिवसापर्यंत योग्यरितीने सुरू आहे. सूर्यकिरणाांच्या मार्गात असलेल्या अडथळ््यांमुळे बुधवारी व गुरुवारी किरणे अंबाबाईच्या मूर्तीच्या चरणापर्यंत व गुडघ्यापर्यंत आल्यानंतर मूर्तीच्या डावीकडे सरकली. शुक्रवारी मात्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सर्व कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन किरणांच्या मार्गातील शक्य तितके अडथळे काढले. इमारतींचे

दोन-तीन फुटांचे बांधकाम उतरविल्याने शुक्रवारी सूर्यकिरणांची दिशाा सरळ रेषेत होती. अगदी देवीच्या उजव्या हाताजवळ असलेल्या गदेपर्यंत सूर्यकिरणे आली होती. सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी गरूड मंडपात आलेली किरणे ५ वाजून ४७ व्या मिनिटाला अंबाबाईच्या खांद्यापर्यंत आली आणि लुप्त झाली.

टॅग्स :TempleमंदिरMaharashtraमहाराष्ट्र