शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परत, शाळा कृती समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:08 IST

कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळां कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तरपत्रिका न तपासता परत केल्या.

ठळक मुद्देशिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परतकायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळ कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तरपत्रिका न तपासता परत केल्या.विना अनुदानित शाळांमध्ये अनेक शिक्षक गेली अठरा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर आणि काही ठिकाणी विना वेतन काम करत आहेत. या विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली.

याची दखल घेवून काही शाळांचे मूल्यांकन करून १४६ शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या. ज्या शाळा अनुदानासाठी घोषित केल्या आहेत त्या शाळांच्या अनुदानाबाबत अद्याप कोणताच निर्णय दिला नाही. याबाबत पाठपुरावा करून सुध्दा शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.मात्र दहावी - बारावीची परीक्षेवेळी मात्र शासनाला आमच्या शिक्षकांची आठवण येते. त्यामुळे या विनाअनुदानित शिक्षकांनी बोर्ड परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उत्तरपत्रिकांची प्रतिकात्मक होळी करून शासनाचा निषेध नोंदवला होता. तरीही बोर्डाने या शिक्षकाकडे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासनीस पाठवली आहे.

या निषेध म्हणून शिक्षकांनी एसएससी बोर्डासमोर उत्तरपत्रिका परत करून तीव्र निषेध केला. यावेळी या शिक्षकांनी शासनाच्या विरोध घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला.यावेळी बाजीराव बरगे, किरण पाटील, रामचंद्र खुडे, सागर पाटील, पल्लवी सुतार, जयश्री कांबळे, पूजा शिंगे, मीनाक्षी स्वामी, पल्लवी कांबळे, दिपाली चौगले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शिक्षक सहभागी झाले होते.

तीव्र निषेध....अनुदान मिळावे या मागणीसाठी संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी २१० वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. या शिक्षकांना स्वत:चा चरितार्थ चालवण्यासाठी शेतमूजरी, रिक्षा चालवणे अन्य कामे करावी लागत आहेत. मात्र शासन कोणतीही दखल घेत नाही, फक्त दहावी - बारावी परीक्षेला आमच्याकडे लक्ष देत्या. त्यामुळे शासनला जाग आणण्यासाठी शिक्षकांनी खांद्यावर पेपर गठ्ठे घेवून शासनाचा विरोधात भर उन्हात तीव्र निषेध केला.

कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे, या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन केले आहे. आमच्या शिक्षकांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन सुमारे १५ हजार उत्तरपत्रिका बोर्डाला आज परत केल्या. पगार न मिळाल्याने शिक्षक वैफल्यग्रस्थ झाले आहेत. उत्तरपत्रिकांबाबत कोणतेही गैरकृत्य झाल्यास याला सर्वस्वी शासनच जबाबदार राहील.- रत्नाकर माळी

 

  1. - भर उन्हात शिक्षकांचे आंदोलन
  2. - पेपर गठ्ठे खांद्यावर घेत केला निषेध
  3. - पंधरा हजार पेपर परत केले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकexamपरीक्षा