शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  तीन प्रभागांत फेरनिवडणुकीची चर्चा, महापालिकेच्या प्रशासनाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:57 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या तीन प्रभागांतील नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे त्या प्रभागात फेरनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनानेही तशी तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देतीन प्रभागांत फेरनिवडणुकीची चर्चामहापालिकेच्या प्रशासनाची तयारी सुरू

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या तीन प्रभागांतील नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे त्या प्रभागात फेरनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनानेही तशी तयारी सुरू केली आहे.

अफजल पीरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्या प्रभागांत फेरनिवडणुकीची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात कोणती अडचण नसली तरी माजी महापौर अश्विनी रामाणे यांच्या प्रभागात फेरनिवडणूक घ्यावी का, याबाबतचे अधिक मार्गदर्शन नगरविकास विभागाकडून मागविण्याचे ठरविले आहे.महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८ - सिद्धार्थनगर येथून निवडून आलेले अफजल पीरजादे व प्रभाग क्रमांक ५५- पद्माराजे उद्यान येथून निवडून आलेले अजिंक्य चव्हाण यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार विभागीय आयुक्तांनी कारवाई केली असून, त्यांना नगरसेवकपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

या दोघांनी फेबु्रवारी महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत पक्षाचा व्हिप डावलून राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील यांच्याविरोधात मतदान केले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी गटनेते सुनील पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती.माजी महापौर अश्विनी अमर रामाणे यांचे नगरसेवकपद सोमवारी (दि. १०) सकाळी साडेदहा वाजता रद्द करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बजावला. त्यामुळे त्यांना सभागृहातून बाहेर जावे लागले होते. रामाणे यांचा ओबीसी दाखला अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नगरसेवकपद रद्दची कारवाई यापूर्वी करण्यात आली होती.

तसेच त्यांच्या प्रभागात निवडणूक प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती; परंतु उच्च न्यायालयातून आयुक्तांच्या कारवाईला त्यांनी स्थगिती मिळविली होती. त्यामुळे त्या सभागृहात येऊन बसत होत्या. त्यानंतर त्यांच्या जातवैधता फेरपडताळणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना जातवैधता प्रमाणपत्र नव्याने मिळालेले नाही.

दरम्यान, जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांवरून एक वर्षाची करण्यात आली. सप्टेंबर २०१८ च्या अध्यादेशानुसार १५ दिवसांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली; पण त्यांना जातवैधता प्रमाणपत्रच प्राप्त झाले नसल्याने अंतिम १५ दिवसांतही ते त्यांना सादर करता आले नाही. त्यामुळे आयुक्तांनी ही कारवाई केली.पीरजादे व चव्हाण यांच्या प्रभागात निवडणूक घेण्यात यावी, अशी निवडणूक आयोगाला विनंती करण्यात महापालिकेचे प्रशासनास कोणतीच अडचण राहिलेली नाही. मात्र अश्विनी रामाणे यांच्या प्रभागात मात्र यापूर्वीच फेरनिवडणूक घेण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने पुन्हा फेरनिवडणूक घेता येईल का, याबाबत नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविण्याचे ठरविले आहे.

सदरचे मार्गदर्शन येताच तिन्ही प्रभागांत एकावेळी निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती केली जाणार आहे. या संदर्भातील कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात महापालिका प्रशासन व्यस्त आहे.

‘स्थायी’वर परिणाम अशक्यसत्तारूढ गटाच्या तीन नगरसेवकांना घरी जावे लागले असल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत काही बदल होईल का, अशी शंका उपस्थित केली जात होती; पण त्यामध्ये काही फरक पडणार नसल्याचे नगरसचिव कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सत्तारूढ गटाच्या तीन नगरसेवकांची पदे रद्द झाल्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ८१ वरून ७८ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थायी समितीवरील संख्याबळ तीनवरून दोनपर्यंत खाली आले, तर कॉँग्रेसचे संख्याबळ पाचवरून सहापर्यंत वाढले आहे. त्यामुळे त्यांचे आठ सदस्य ‘स्थायी’वर आहेत. शिवसेनेच्या एक सदस्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर