शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तासगाव कारखान्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू, एन. डी. पाटील यांना सहकारमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:23 IST

तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण जातीने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी देशमुख यांची कोल्हापूरच्या विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रा. पाटील यांना आश्वस्त केले.

ठळक मुद्देतासगाव कारखान्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलूएन. डी. पाटील यांना सहकारमंत्र्यांची ग्वाही

कोल्हापूर : तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण जातीने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी देशमुख यांची कोल्हापूरच्या विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रा. पाटील यांना आश्वस्त केले.हा कारखाना गेले पाच हंगाम बंद आहे. कारखान्याची एका कंपनीला झालेली विक्रीही लढ्यानंतर रोखण्यात आली. कारखान्याचा ताबा राज्य बॅँकेकडे ताबा आहे; परंतु विक्री रद्द झाल्यानंतर पुढे तो सभासदांची मालकी ठेवून चालवायला देणे, भाडेतत्त्वावर देणे यासाठी राज्य बॅँकेने काहीही केलेले नाही.

या पार्श्वभूमीवर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील आणि कारखाना बचाव समितीचे संजय संकपाळ-पाटील यांना सोबत घेऊन प्रा. एन. डी. पाटील यांनी देशमुख यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली.तासगाव आणि पलूस या दोन तालुक्यांतील १०३ गावे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असून, रोज २७५० टन गाळप क्षमता आहे. पाच ते सहा लाख टन ऊस बैलगाडीने येण्याजोगा आहे.

या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामाला अजूनही चार महिन्यांचा अवधी आहे. किमान या हंगामापासून तरी हा कारखाना सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रा. पाटील यांनी मंत्र्यांना आवाहन केले. त्यावर देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस