शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘पुजारी हटाओ’चा निर्णय अधिवेशनात घ्या, पुजारी हटाओ समितीतर्फे शिवाजी चौकात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 17:02 IST

करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाओचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळून या विधीमंडळ अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुजारी हटाओ समितीतर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. हटाओ...हटाओ...पुजारी हटाओ...’‘मंदीर आमच्या हक्काचे...’अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

ठळक मुद्दे ‘पुजारी हटाओ’चा निर्णय अधिवेशनात घ्याअंबाबाई मंदीर पुजारी हटाओ समितीतर्फे शिवाजी चौकात निदर्शने

कोल्हापूर : करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाओचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळून या विधीमंडळ अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुजारी हटाओ समितीतर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. हटाओ...हटाओ...पुजारी हटाओ...’‘मंदीर आमच्या हक्काचे...’अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.दुपारी साडेबाराच्या सुमारास अंबाबाई मंदीर पुजारी हटाओ समितीचे सदस्य छत्रपती शिवाजी चौकात एकवटले. या ठिकाणी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटवा आणि शासननियुक्त पुजारी नेमावा, पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द या अधिवेशानत पाळावा, अंबाबाईच्या नावान चांगभल अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून अंबाबाई मंदीरातील पुजारी हटवून शासनाकडून पगारी पुजारी नेमावेत यासाठी लढा सुरु आहे. यामध्ये अंबाबाईच्या भक्तांचाही समावेश आहे. मंदीर किंवा मंदीर परिसरात पावित्र्य राखण्यासाठी तसेच शांतता भंग होऊ नये, यासाठी संयमाने रस्त्यावरचा हा लढा सुरु आहे.

यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांनी समितीला कोणत्याही परिस्थितीत शासननियुक्त पगारी नेमू तसेच प्रसंगी तसा वटहुकुम काढू असे अनेकवेळा आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेला शब्द येणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशन पाळा, याची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार, सुजित चव्हाण,बाबा पार्टे, राजेश लाटकर, अनिल कदम, दुर्गेश लिंग्रस, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, दिलीप पाटील, विराज पाटील, राजू यादव, विनायक फाळके, राजेंद्र पाटील इंद्रजीत सावंत, सुनील देसाई, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, जहीदा मुजावर, अभिजीत बुकशेठ आदी सहभागी झाले होते.

तामिळनाडूच्या धर्तीवर कोल्हापूरातही निर्णय घ्यावातामिळनाडूतील मयुरानाथस्वामी मंदीरातील देवीला सलवार कमिज घातल्याबद्दल तेथील पुजाऱ्याला हटविले. त्याप्रमाणे कोल्हापूरातील अंबाबाई मंदीरातील पुजाऱ्याबाबतही तामिळनाडूच्या धर्तीवर निर्णय घ्यावा, असे दिलीप पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर