शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चव्हाण दाम्पत्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ उपोषण, खोटा गुन्हा दाखल करण्याऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 18:22 IST

राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यामधील आरोपींशी हातमिळवणी करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी सुधाकरनगर येथील अ‍ॅड. चारूलता राजेंद्र चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र (रा. एस-५, सारंग अपार्टमेंट) या दाम्पत्याने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाजवळ उपोषण केले.

ठळक मुद्देखोट्या गुन्ह्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करा खोटा गुन्हा दाखल करण्याऱ्यांवर कारवाई करा, चारूलता चव्हाणांची मागणीचव्हाण दाम्पत्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ उपोषण

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यामधील आरोपींशी हातमिळवणी करून आमच्यावर केला. गुन्ह्याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी सुधाकरनगर येथील अ‍ॅड. चारूलता राजेंद्र चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र (रा. एस-५, सारंग अपार्टमेंट) या दाम्पत्याने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाजवळ उपोषण केले.यापूर्वी याबाबतचे निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना देण्यात आले होते. चव्हाण यांच्यावर झालेल्या अन्यायाची चौकशी व्हावी, अशा सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या होत्या; पण त्याबद्दल पुढे काहीही झाले नाही; म्हणून मी उपोषणाला बसले असल्याचे चारूलता चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.राजारामपुरी पोलिसांत एका गुन्ह्यात आरोपींवर कारवाईऐवजी त्यांच्याशी हातमिळवणी केली. हा तपास थांबवून कागदपत्रांमध्ये हवा तसा बदल करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच खऱ्या गुन्ह्यातील पुरावा नष्ट करून खोटा पुरावा गोळा करण्यासाठी संबंधित अधिकारी आमच्या घरात बेकायदेशीररीत्या घुसले व त्यांनी मुलास मारहाण केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा. याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८१/२०१७ अशी पोलीस दप्तरी नोंद आहे.याचबरोबर कोल्हापूर जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमाच्या तिकिटांचे पैसे मला तत्काळ परत मिळण्याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयातून आदेश होऊनही जाणीवपूर्वक पोलीस अधीक्षक, कोल्हापूर कार्यालयाकडून पैसे मिळालेले नाहीत. सात वर्षे होऊनही मला न्याय मिळालेला नाही. तरी या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अ‍ॅड. चारूलता चव्हाण यांनी सांगितले.

राजारामपुरी पोलिसांत खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सुधाकरनगर येथील अ‍ॅड. चारूलता चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र चव्हाण हे दाम्पत्य गुरुवारी ताराबाई पार्कातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ आमरण उपोषणास बसले होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार