शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कोल्हापूर : पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारणाऱ्यांवर कारवाई करा, स्थायी समिती सभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 11:42 IST

कोल्हापूर शहरात इमारती बांधण्यापूर्वी नकाशावर पार्किंगची जागा राखीव ठेवली जाते; मात्र प्रत्यक्षात नकाशातील या पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारले जातात. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी  महानगरपालिका स्थायी समिती सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.

ठळक मुद्देपार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारणाऱ्यांवर कारवाई करास्थायी समिती सभेत मागणी

कोल्हापूर : शहरात इमारती बांधण्यापूर्वी नकाशावर पार्किंगची जागा राखीव ठेवली जाते; मात्र प्रत्यक्षात नकाशातील या पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारले जातात. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी  महानगरपालिका स्थायी समिती सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने पार्किंगचा हा विषय प्रतिज्ञा निल्ले यांनी सभेत उपस्थित केला. शहरात बऱ्याच ठिकाणी इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. व्यापारी पेठेत येणारे लोक रस्त्यावरच वाहने लावतात.

याबाबत प्रशासन म्हणून काय कारवाई करणार, अशी विचारणा निल्ले यांनी केली. तर ज्यांनी पार्किंगच्या जागेत दुकानगाळे सुरू केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संदीप नेजदार, राहुल माने यांनी केली.

माजी आयुक्त पी. शिवशंकर यांनी बंदिस्त पार्किंगबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पार्किंगची गंभीर समस्या असताता प्रशासनाने काय केले, अशी विचारणाही नेजदार यांनी केली.शिवशंकर यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितांवर कारवाईच्या नोटीसा दिल्या होत्या. काहींना पार्किंग खुले करण्याचे तसेच दंड भरण्याचे आदेश दिले होते; परंतु बऱ्याच जणांनी दंड भरलेला नाही; म्हणून त्यांच्या घरफाळा बिलात दंडाची रक्कम थकबाकी म्हणून लावा, असे घरफाळा विभागास कळविले असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला.देवकर पाणंद येथे एका बिल्डरने एक नैसर्गिक नाला वळविला असून त्याच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणी दीपा मगदूम यांनी केली.

नगररचना विभागाने सुनावणी लावली होती, त्याचे काय झाले, अशी विचारणाही मगदूम यांनी केली. त्यावर खुलासा करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, नाल्याची  सुनावणी घेण्यात आली; परंतु कागदपत्रावर नाला आढळून आलेला नाही.शिवाजी मार्केट येथील लिफ्ट एक महिना बंद आहे याकडे कविता माने यांनी लक्ष वेधले. पावसाचे पाणी पडल्याने लिफ्ट बंद पडली आहे. दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून पंधरा दिवसांत ती दुरुस्त होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर