शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पिस्तूल प्रकरणी दिंडनेर्लीतील स्वप्निल शिंदेला अटक, ‘लोकमत’च्या दणक्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:18 IST

देशी बनावट पिस्तुलाचा मालक दुसरा-तिसरा कोणी नसून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील खासगी सावकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी संशयित स्वप्निल श्रीकांत शिंदे (वय ५२) याच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्देपिस्तूल प्रकरणी दिंडनेर्लीतील स्वप्निल शिंदेला अटक‘लोकमत’च्या दणक्याने कारवाई

कोल्हापूर : देशी बनावट पिस्तुलाचा मालक दुसरा-तिसरा कोणी नसून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील खासगी सावकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी संशयित स्वप्निल श्रीकांत शिंदे (वय ५२) याच्या मुसक्या आवळल्या.पिस्तूल बाळगल्याप्रकरणी संशयित प्रवीण बंडू गुरव (२९, रा. येवती, ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्याच्याजवळ असलेले पिस्तूल हे दिंडनेर्ली येथील एका खासगी सावकाराचे असून, पोलीस या तपासाला बगल देत राजकीय दबावाखाली ‘त्या’ सावकाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घेऊन, सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदेवर पोलिसांनी कारवाई केली.दिंडनेर्ली येथे संशयित प्रवीण गुरव याच्या कब्जात हुबेहूब इंग्लिश बनावटीसारखे दिसणारे देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला २९ नोव्हेंबरला पकडले होते.

हे पिस्तूल स्वप्निल शिंदेचे होते. गुरव हा त्याच्याकडे जेसीबी यंत्रावर चालक आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. तो गुन्हेगारी वृत्तीचा नाही. त्याचा कोणाशी वादही नाही. त्याने शिंदेकडून दीड लाख रुपये कर्ज घेतले होते.

शिंदेला वाचविण्यासाठी गुरवने पिस्तूल आपल्या कब्जात घेतले आणि स्वत: आरोपी झाल्याची येवती, दिंडनेर्ली परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पिस्तूलमालक सावकाराचा खरा चेहरा पुढे आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले.

त्यानंतर शिंदेच्या मुसक्या आवळल्या. त्याने हे पिस्तूल कोठून खरेदी केले याचा तपास इस्पुर्लीचे सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर