शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कोल्हापूर :  स्वप्निल राजशेखर यांचा सावट लघुपट कान्समध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 10:23 IST

निर्भया ते कोपर्डी असा संदर्भ असलेल्या आणि कष्टकरी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलीच्या वाट्याला आलेल्या भोगाची छोटीशी कहाणी सांगणाऱ्या कोल्हापूरातील स्वप्निल राजशेखर दिग्दर्शित सावट हा लघुपट प्रतिष्ठेच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या कान्स शॉर्टफिल्म कॉर्नरमध्ये दाखविण्यासाठी निवडण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्वप्निल राजशेखर यांचा सावट लघुपट कान्समध्येकोल्हापूरच्या लघुपटाला सन्मान : कोल्हापूरचे तंत्रज्ञ, कलाकार

संदीप आडनाईककोल्हापूर : निर्भया ते कोपर्डी असा संदर्भ असलेल्या आणि कष्टकरी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलीच्या वाट्याला आलेल्या भोगाची छोटीशी कहाणी सांगणाऱ्या स्वप्निल राजशेखर दिग्दर्शित सावट हा लघुपट प्रतिष्ठेच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या कान्स शॉर्टफिल्म कॉर्नरमध्ये दाखविण्यासाठी निवडण्यात आला आहे.कोल्हापूरातील मातीत तयार झालेला आणि कोल्हापूरचे तंत्रज्ञ तसेच कलाकारांचा समावेश असलेला सावट हा हा अवघ्या २४ मिनिटांचा लघुपट. या लघुपटाची संकल्पना, पटकथा आणि संवाद आणि दिग्दर्शनही अभिनेता स्वप्निल राजशेखर यांचे आहे.निर्मात्या कविता चुरी, अभिषेक शेट्ये कॅमेरामन, डिझाईन मयूर कुलकर्णी, संकलन सलोनी कुलकर्णी यांच्यासह कैलास वाघमारे, प्रमोद फडतरे, स्नेहल संकपाळ आणि देवयानी शिंदे या कलाकारांचा अभिनय असलेल्या या लघुपटाला आतापर्यंत देशभरात ४१ विविध राष्ट्रीय पुरस्कार लाभलेले आहेत.८ मे ते १९ मे २0१८ या कालावधीत कान्स येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या कान्स शॉर्टफिल्म कॉर्नरमध्ये हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. गतवर्षी कोल्हापूरच्याच उमेश बगाडे यांचा चौकट हा लघुपटही कान्सच्या शॉर्टफिल्म कॉर्नरमध्ये दाखविण्यात आला होता.गोल्डन फिल्मिंगोचे सहकार्यमुंबईतील फिल्मिंगो शॉर्टफिल्म महोत्सव हा प्रतिष्ठेचा महोत्सव आहे. या महात्सवात १६0 लघुपटातून सावटला पहिले गोल्डन फिल्मिंगो अ‍ॅवार्ड मिळाले. या महोत्सवातील पहिल्या पाच विजेत्या लघुपटांच्या प्रवेशिका कान्ससाठी पाठविण्यात येतात. यंदा पाठविलेल्या पाचही लघुपटांना कान्समध्ये निवडण्यात आले आहे. त्यात सावटचा समावेश आहे.

दर्जेदार आणि चांगल्या लघुपटांचा पायंडा पडत आहे. सावटची कान्ससाठी निवड होणे हा त्या विषयाला मिळालेला न्याय आहे. सावट सर्वदूर पोहोचतोय, त्याला पसंती मिळतेय यासारखा आनंद दुसरा नाही.स्वप्निल राजशेखर,अभिनेता, दिग्दर्शक, सावट

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूक