शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सीपीआरच्या प्रसूतिगृहाला विविध संघटनांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:20 IST

छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाच्या (सीपीआर) प्रसूतिगृहाला विविध संघटनांनी मदतीचा हात दिला. या संघटनांनी बेड, कचराकुंडी आदी साहित्य या विभागाला देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

ठळक मुद्देसीपीआरच्या प्रसूतिगृहाला विविध संघटनांचा मदतीचा हातबेड, कचराकुंडी दिली; सामाजिक बांधिलकी जपली

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाच्या (सीपीआर) प्रसूतिगृहाला विविध संघटनांनी मदतीचा हात दिला. या संघटनांनी बेड, कचराकुंडी आदी साहित्य या विभागाला देऊन सामाजिक बांधिलकी जपली.या प्रसूतिगृहामध्ये २५ बेड आणि गाद्या, ५० कचराकुंड्यांची गरज आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले. त्यातील पहिले पाऊल म्हणून रूईकर कॉलनीतील ‘आर के ग्रुप’च्या रोहित कोलवालकर यांनी दहा कचरा कुंड्या आणि आठशे सॅनिटरी नॅपकिन दिले.त्यासह सीपीआरमध्ये ठिकठिकाणी त्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगणारे आणि याबाबत जनजागृतीचे फलक लावले. या उपक्रमात लहान आणि तरूण मुले सहभागी झाले. हृदयस्पर्श ग्रुपचे सदस्य रामेश्वर पत्की यांनी कचराकुंड्यांची भेट दिली.

शैलेश पाटील सडोलीकर यांनी मातृदिनाचे औचित्यसाधून आई गीतांजली यांच्या स्मरणार्थ सीपीआरला सर्वसोईनी युक्त बेडची भेट दिली. या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची मदत ‘सीपीआर’चे वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, प्रभारी विभाग प्रमुख स्त्री रोग व प्रसुतीविभाग डॉ. जोत्स्ना देशमुख यांच्या सुर्पूद केली.

यावेळी समाजसेवा अधीक्षक उज्वला सावंत, जयवंत कदम, आदी उपस्थित होते. हेल्पिंग हँन्डस् फौडेशनच्या कोल्हापूर शाखेतर्फे गीता हसूरकर, ज्योती जाधव ,मंगला नियोगी , साईशा हसूरकर अमित भोसले, सुचेत हिरेमठ, अमोल घोरपडे, रोहीत सवाईराम, महेश सूर्यवंशी, सारंग तेरदाळकर, प्रथमेश ढोले, प्रणव पवार, सुरज देसाई यांनी मदत केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल