शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कारवरील स्टिकर पोलिस अधीक्षकांच्या नजरेत आले, थेट जप्तीचे आदेश दिले; असं नेमकं काय लिहिलं.. वाचा

By उद्धव गोडसे | Updated: August 28, 2025 14:04 IST

हटके हौसेचे मोल चुकते करावे लागले

उद्धव गोडसेकोल्हापूर : वाहनांवर काहीतरी भन्नाट ओळी लिहून लक्ष वेधून घेण्याचा किंवा संदेश देण्याचा प्रकार प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांत बसत नाही. तरीही काही हटके मजकूर लिहिण्याची हौस वाहनधारकांमध्ये असते. कोल्हापुरातील एका कारमालकाला अशाच त्याच्या हटके हौसेचे मोल चुकते करावे लागले.

'सावधान!, हे मशीन आहे. या गाडीला मेंदू नाही. आपला मेंदू वापरा,' अशा ओळी लिहिलेले कारवरील स्टिकर पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या नजरेत आले आणि त्यांनी थेट कार जप्त करून कारवाई करण्याचा आदेश दिला. हा प्रकार बुधवारी (दि. २७) सकाळी घडला.पोलिस अधीक्षक योगेश कुमार बुधवारी सकाळी बापट कॅम्प येथे निघाले होते. लिशा हॉटेल चौकात त्यांना एक कार दिसली. कारच्या मागील काचेवर एक स्टिकर होते. 'सावधान!, हे मशीन आहे. या गाडीला मेंदू नाही. आपला मेंदू वापरा,' अशा ओळी त्यावर लिहिल्या होत्या. तसेच मागच्या बाजूची नंबरप्लेट नव्हती. अधीक्षकांनी तातडीने संबंधित कार जप्त करून मालकावर कारवाई करण्याचा आदेश दिला.

त्यानुसार काही मिनिटांत शाहूपुरी पोलिस लिशा हॉटेल चौकात पोहोचले. त्यांनी संबंधित कार जप्त करून पोलिस ठाण्यात आणली. कारवरील स्टिकर आणि नंबरप्लेटबद्दल पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी कारच्या मालकाकडे चौकशी केली. दंडात्मक कारवाई करून त्याला सोडून दिले.

आधीच्या मालकामुळे अडकलामुंबई पासिंग असलेली कार चार महिन्यांपूर्वीच कोल्हापुरातील तरुणाने खरेदी केली आहे. आधीच्या मालकाने ते स्टिकर लावले होते. गेल्याच आठवड्यात गाडी वळवताना मागील नंबरप्लेट तुटल्याचे सांगत त्याने कारमधील तुटलेली नंबरप्लेट पोलिसांना दाखवली. कार खरेदीची कागदपत्रे दाखवत आक्षेपार्ह स्टिकर काढण्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याची पोलिस ठाण्यातून सुटका झाली.