शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : खिडकीकडेला झोपण्यावरून विद्यार्थ्यांला जीवे मारले, आश्रमशाळेतील घटना : आटपाडीच्या अल्पवयीन तरुणांवर खूनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 19:13 IST

वसतिगृहात खिडकीकडेला झोपण्याच्या कारणावरून रजपूतवाडी (ता. करवीर) येथील प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतिराव फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहात दोघा विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देखिडकीकडेला झोपण्यावरून विद्यार्थ्यांला जीवे मारलेरजपूतवाडी (ता. करवीर) येथील आश्रमशाळेतील घटना आटपाडीच्या अल्पवयीन तरुणांवर खूनाचा गुन्हा

कोल्हापूर : वसतिगृहात खिडकीकडेला झोपण्याच्या कारणावरून रजपूतवाडी (ता. करवीर) येथील प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतिराव फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहात दोघा विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

शंकर सावळाराम झोरे (वय १७, रा.अंबाई वाडा उखळू, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. १०) रात्री घडली. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

शंकर झोरेया प्रकरणी याच महाविद्यालयात अकरावीत शिकणारा अल्पवयीन विद्यार्थी (मूळ राहणार आटपाडी, जि. सांगली) याच्यावर जीवे मारल्याप्रकरणी करवीर पोलिसांत गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतची फिर्याद वसतिृगृह अधीक्षक दत्तात्रय म्हादू जाधव (वय ५३ मूळ रा. वाखारी, ता. देवळा, जि. नाशिक, सध्या रा. सोनतळी, ता. करवीर) यांनी दिली.याबाबत महाविद्यालय प्रशासनाने दिलेली माहिती अशी की,‘रजपूतवाडीत भटक्या व विमुक्त समाज शिक्षण मंडळ संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा आणि महात्मा जोतिराव फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चालविले जाते.महाविद्यालयाच्या आवारातच मुलांचे वसतिगृह आहे. पहिल्या मजल्यावर पहिली ते सातवी आणि दुसऱ्या मजल्यावर आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांची सोय आहे. या मजल्यावरील खोलीत संशयित आरोपी शंकरला खिडकी कडेला झोप असे म्हणत होता परंतू त्यास तो तयार नव्हता. त्यावरून बुधवारी रात्री अकरावी आर्टसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर शंकरचा वाद झाला.

वसतिगृहातील याच खोलीमध्ये मृत शंकर झोरे व संशयिताचा वाद झाला होता.  (छाया : आदित्य वेल्हाळ)

यामध्ये त्या विद्यार्थ्याने शंकरच्या छातीवर, पोटावर ठोसे मारले. त्यामध्ये शंकर अस्वस्थ झाला. इतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार वसतिगृह अधीक्षक दत्तात्रय जाधव यांना सांगितला. जाधव यांनी तत्काळ त्याला दुचाकीवरून वडणगे (ता.करवीर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्याला डॉक्टरनी सीपीआरमध्ये नेण्यास सांगितले.

सीपीआरमध्ये आणल्यावर शंकर झोरेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. जाधव यांनी घडला प्रकार झोरे यांच्या कुटुंबीयांना व करवीर पोलिसांना कळविला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

शवविच्छेदनानंतर शंकरचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतला. गुरुवारी सकाळी अंबाईवाडा या मूळ गावी शंकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गरिब शेतकऱ्याचा मुलगा..शंकर हा दहावीपासून आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील शेतीचे काम करतात. संशयित आरोपीने याचवर्षी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. सध्या त्याचे आई-वडील खांडवा (मध्यप्रदेश) येथे राहत असून त्याठिकाणीच काम करतात.

वसतिगृहातील विद्यार्थी संख्या...* पहिली ते सातवी विद्यार्थी : १२० पैकी ९१ उपस्थित* आठवी ते १२ वी : १०९ पैकी ८८

घटनेनंतर तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव व मी स्वत: घटनास्थळी भेट दिली. शंकर झोरे याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.-दिलीप जाधव,पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे.

 

वसतिगृहात रोज सकाळी नाष्टा, जेवण दिले जाते तर सायंकाळी सातनंतर जेवण दिले जाते. बुधवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचे जेवण झाले. त्यानंतर रात्री हा प्रकार घडला.- दत्तात्रय जाधव,अधीक्षक वसतिगृह, रजपूतवाडी.

 

 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर