शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे : विनोंद कांबळे, चिल्लर पार्टीतर्फे मुलांसाठी दोन पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 14:49 IST

विद्यार्थ्यांचे भावविश्व वेगळे असते. ते विद्यार्थ्यांनी शब्दबध्द केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे, असे आवाहन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे सचिव प्रा. विनोद कांबळे यांनी शाहू स्मारक भवन येथे केले.

ठळक मुद्देकोल्हापूर : विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे : विनोंद कांबळेचिल्लर पार्टीतर्फे मुलांसाठी दोन पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे भावविश्व वेगळे असते. ते विद्यार्थ्यांनी शब्दबध्द केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे, असे आवाहन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे सचिव प्रा. विनोद कांबळे यांनी शाहू स्मारक भवन येथे केले.पुस्तके विकत घेउन वाचण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, यासाठी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत मोफत चित्रपट प्रदर्शनासोबतच पुस्तकांचीही चळवळ सुरु केली आहे. या उपक्रमांतर्गत चंद्रकांत निकाडे यांनी लिहिलेल्या गृहपाठी आणि कुडतं या दोन कथासंग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रा. कांबळे यांनी चिल्लर पार्टीच्या विविध उपक्रमांचे कौतुक आपल्या भाषणात केले. चिल्लर पार्टीच्या सदस्यांनी लिहिलेल्या अनुभवाचे पुस्तक दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेमार्फत प्रकाशित करण्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत निकाडे यांनी आपल्या भाषणात लहान मुले ही माझ्या लेखनाची प्रेरणा आहे, असे सांगून प्रकाशित झालेली पुस्तके पाच लाख विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्याचा संकल्प केला असल्याचे जाहीर केले.चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या प्रा. समीक्षा फराकटे यांनी सूत्रसंचालन केले. जयसिंग चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर अनिल काजवे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत निकाडे यांनी लिहिलेली पुस्तके विकत घेतली.बिया संकलन उपक्रमाला प्रतिसादपावसाळ्यात वेगवेगळ्या बिया जिल्ह्यात रुजविण्यासाठी बिया संकलन करण्याचा उपक्रम चिल्लर पार्टीतर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. साठवलेल्या बिया जुनअखेर चिल्लर पार्टीकडे जमा कराव्यात, असे आवाहन उदय संकपाळ यांनी केले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक