शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विनंती थांब्याचे एस.टी.ला वावडे, चालकांचा मनमानी कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:19 IST

एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यांनाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या मार्गांवर धावणाºया एस. टी. बसेस शहरातील विनंती थांब्यांवरील प्रवाशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे.

ठळक मुद्दे विनंती थांब्याचे एस.टी.ला वावडे, चालकांचा मनमानी कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कोल्हापूर : एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यांनाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या मार्गांवर धावणाºया एस. टी. बसेस शहरातील विनंती थांब्यांवरील प्रवाशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे.महामंडळाच्या वतीने विविध ठिकाणी प्रवाशांच्या सोईसाठी विनंती थांबे उभे केले आहेत. मात्र चालक-वाहकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच; पण चालकांच्या या बेशिस्त वर्तनाकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने तोट्यातील एस.टी. अधिकच खड्ड्यात रुतत आहे.बेळगाव, निपाणी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या मार्गांवरील अनेक गाड्या मंडळाने दिलेल्या विनंती थांब्यावर प्रवासी असूनसुद्धा थांबत नाहीत; तर प्रवाशांनी गाडी थांबविण्याची विनंती करूनसुद्धा गाडी थांबविली जात नाही. विशेषकरून टेंबलाईवाडी, शिवाजी विद्यापीठ, आर.सी.सी. बिल्डर स्टॉप, उजळाईवाडी येथील उड्डाणपूल या परिसरांत अनेक प्रवाशांनी हात दाखवूनसुद्धा एस. टी. बसेस न थांबविता रिकाम्या घेऊन जाण्यात चालक व वाहकांना धन्यता वाटते. त्याचा फटका विशेषत: महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह वयोवृद्ध व महिला प्रवाशांना बसत आहे.

कर्नाटक गाडीला पसंतीहनुमानगर परिसर, ग्रीन पार्क, मोरेवाडी, आर. के.नगर, राजेंद्रनगर परिसरातील नागरिकांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या आर.सी.सी. बिल्डर स्टॉप येथे विनंती थांबा आहे. अनेकजण या ठिकाणी एस.टी.ची वाट पाहत थांबतात. प्रवाशांनी हात दाखवून विनंती करूनसुद्धा गाड्या थांबविल्या जात नाहीत. मात्र, कर्नाटकातील गाड्या थांबून प्रवाशांना घेऊन जातात. त्यामुळे अनेकजण बेळगाव, निपाणीवरून येताना कर्नाटकच्या गाड्यांना पहिली पसंती देतात. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील एस. टी.ला प्रवाशांची अ‍ॅलर्जी आहे का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

आर.सी.सी. बिल्डर स्टॉप येथे एस.टी. बसला हात दाखवूनसुद्धा बसेस थांबत नाहीत. तसेच बेळगाव, गडहिंग्लज व निपाणी येथून कोल्हापूरला येताना वाहकाला विनंती थांब्यावर गाडी थांबविण्याची विनंती करूनसुद्धा गाडी थांबविली जात नाही. मग विनंती थांबा दाखविण्यासाठी लावला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.- श्रीकांत भोसले, प्रवासी 

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर